नवी दिल्ली - सरकार स्थापनेनंतर पार पडलेल्या पहिल्याच बैठकीत नरेंद्र मोदींनी छोट्या व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, छोटे दुकानदार आणि छोट्या व्यावसायिकांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
माहिती आणि सुचना प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, यामुळे सर्वांना भविष्याबाबत सुरक्षेची हमी मिळणार आहे. नवीन योजनेनुसार सर्व दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि स्वयंसेवी व्यक्तींना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिन्याला ३ हजार पेन्शन मिळणार आहे. येणाऱ्या ३ वर्षात ५ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे.
ज्या व्यावसायिकांचा व्यवहार १ कोटी ५० लाखांपेक्षा कमी आहे आणि वय १८ ते ४० वर्षे असणारे छोट्या व्यावसायिक या योजनेसाठी नोंदणी करू शकतात. यासाठी १८ वर्षे वय असणाऱ्या व्यक्तींना प्रतिमहिना २ रुपये, २९ वर्षांपूढील व्यक्तींना प्रतिमहिना १०० रुपये आणि ४० वर्षांपूढील व्यक्तीना प्रतिमहिना २०० रुपये जमा करावे लागणार आहेत.