नवी दिल्ली - लहान मुलं आजारी असल्यावर डॉक्टरांकडे जायला घाबरतात. इंजेक्शन म्हटलं तर भोंगा पसरवल्याशिवाय मुलं राहत नाहीत. दिल्लीमध्ये एका लहान मुलीच्या फ्रॅक्चर पायाचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांना पहिल्यांदा तिच्या आवडत्या बाहुलीचं ऑपरेशन कराव लागलं. त्यानंतरच या लहानगीनं डॉक्टरांना उपचार करु दिले. आता तिची बाहुलीही तिच्याबरोबर दवाखान्यात उपचार घेत आहे.
जेमतेम ११ महिन्यांची जिक्रा नावाची मुलगी खेळताना पलंगावरुन खाली पडल्यानंतर तिचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर तिला लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र, ही चिमुरडी डॉक्टरांना उपचार करु देत नव्हती. तिचे रडगाणे सुरुच होते. त्यामुळे डॉक्टरांनाही तिच्यावर कसे उपचार करावेत हे सूचत नव्हते. दरम्याम, जिक्रा तिची आवडती बाहुली तिच्याजवळ आणण्याची मागणी करत होती.
हेही वाचा - आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीची अंतिम यादी जाहीर; १९ लाख लोकांना वगळले
जेव्हा जिक्राच्या आवडत्या बाहुलीला रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा ती खूश झाली. तिचं बाहुलीवर असलेल प्रेम पाहुन डॉक्टरांनी पहिल्यांदा बाहुलीला इंजेक्शन दिले. त्यानंतर तिला इंजेक्शन दिले. मात्र, मग जिक्राने रडायचे थांबवले. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर डॉक्टरांनी प्रथम तिच्या आवडत्या बाहुलीच्या पायाला प्लास्टर केले नंतर जिक्राच्या पायाला प्लास्टर केले. बाहुलीवर प्लास्टर करू दिल्यानंतरच या चिमुरडीने डॉक्टरांना उपचार करू दिले.
हेही वाचा - वादाच्या भोवऱ्यात 'साहो' : निर्मात्यावर लिसा रेने केला 'चोरी'चा आरोप
जिक्रा दोन महिन्यांची असताना तिला तिच्या आज्जीने बाहुली भेट दिली होती. तेव्हा पासून जिक्राला बाहुलीचा लळा लागला आहे. तिच्या या बाहुली प्रेमामुळे तिचं ऑपरेश करता आल्यामुळे कुटुंबियांच्या जिवात जीव आला.