सिरसा - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच हाल होत आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांवरदेखील होताना पाहायला मिळत आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. अशात शेतीच्या कामांसाठी मजूर मिळणेही अवघड झाले आहे. या परिस्थितीत विद्यार्थी स्वतःच शेतातील धान्याची काढणी आणि अभ्यास हे दोन्ही करत आहेत.
सिरसामधील बकरियावाली या गावात काही मुले पिकांची काढणी करत अभ्यास करताना दिसले. त्यांच्यासोबत संवाद साधल्यावर समजले, की कामासाठी मजूर मिळत नसल्याने ही मुले शेतात मदत करत आहेत. यादरम्यान वेळ मिळताच ते अभ्यासही करत आहेत. ऑनलाईन आणि मोबाईल एज्युकेशनमुळे त्यांना शिक्षकांची मदतही मिळत आहे.
अभ्यासासाठी सरकारने केल्या आहेत सोयी -
लॉकडाऊनदरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारने अनेक सुविधा केल्या आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास घेतले जात आहेत. शिक्षण विभागाने "Bright tutee digital learning app" लॉन्च केले आहे. ज्याद्वारे विद्यार्थी बोर्डाचा अभ्यासक्रम पाहून अभ्यास करु शकतात.