नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायाालयाच्या आदेशानुसार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली आहे. ट्रस्टच्या समितीची पहिली बैठक आज(बुधवारी) दिल्लीमध्ये होणार आहे. मंदिर बांधण्यासाठी मुहूर्त ठरवण्याबरोबरच इतर विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज(बुधवार) सायंकाळी बैठक होणार आहे. सर्वसामान्य जनतेकडून पैसे गोळा करावे की नाही? भूमीपूजनापासून काम पूर्ण होण्यास कीती वेळ लागेल? यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. भविष्यात कोणताही वाद उद्भवू नये म्हणून पारदर्शीपणे कारभार करण्यावर भर दिला जाणार आहे. मंदिर बांधताना रामाची मूर्ती ठेवण्यासंबधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.
ट्रस्टमध्ये अन्य पदाधिकारी कोण असतील यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. ५ फेब्रुवारीला ट्रस्ट निर्माण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार ट्रस्टचे काम पूर्ण करण्यात आले आहेत.