ETV Bharat / bharat

बेरोजगारी, स्थलांतरावर बोलण्याचे तेजस्वी यादव यांचे नितीश यांना आवाहन

'मुख्यमंत्री नितीश कुमार आमच्यावर हल्ला चढवत असले तरी, ते जे काही बोलतील, ते आमच्यासाठी आशीर्वादाचेच असेल. आमच्यावर हल्ला करून ते अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत," असे राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले.

author img

By

Published : Oct 30, 2020, 1:11 PM IST

तेजस्वी यादव
तेजस्वी यादव

पाटणा (बिहार) - राजद नेते तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना बेरोजगारी आणि स्थलांतर या मुद्द्यांवर बोलण्याचे आवाहन केले. 'माझ्या कुटुंबावर भाष्य करून मुख्यमंत्री नितीशकुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. शिवाय ते माझ्याबद्दल अपशब्द वापरतात, पण ते जनतेवर परिणाम करणारे महागाई आणि भ्रष्टाचारासारख्या खऱ्या मुद्द्यांवर बोलणार नाहीत,' असे तेजस्वी यादव म्हणाले.

'नितीशजी हे मान्य करतात की, आपल्या सरकारच्या 15 वर्षांत त्यांनी राज्यातील शिक्षण, आरोग्य आणि उद्योगांचा सत्यानाश केला. त्यांनी दोन पिढ्यांचे वर्तमान आणि भविष्यही उद्ध्वस्त केले. ते बेरोजगारी, रोजगार, उद्योग, गुंतवणूक आणि स्थलांतर याविषयी काहीही बोलत नसल्याचे हेच कारण आहे. त्यांनी या मुद्द्यांवर का बोलू नये?' असा सवालही तेजस्वी यादव यांनी केला आहे.

  • आदरणीय नीतीश जी मानते है कि उन्होंने बिहार में 15 वर्ष के शासनकाल में शिक्षा,स्वास्थ्य,उद्योग चौपट करने के साथ-2 दो पीढ़ियों का वर्तमान और भविष्य बर्बाद किया है इसलिए वो बेरोजगारी, नौकरी, कारख़ाने,निवेश और पलायन पर कभी कुछ नहीं बोलते।

    क्या उन्हें इन मुद्दों पर नहीं बोलना चाहिए?

    — Tejashwi Yadav (@yadavtejashwi) October 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'माझ्या कुटुंबावर भाष्य करून नितीशकुमार पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. कारण, त्यांनाही 6 भावंडे आहेत. अशी भाषा वापरुन नितीशकुमार यांनी महिलांचा आणि माझ्या आईच्या भावनांचा अपमान केला आहे. ते महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इत्यादी मुख्य मुद्द्यांवर बोलत नाहीत. ते फक्त आम्हाला शिवीगाळ करू शकतात,' अशी प्रतिक्रिया यादव यांनी नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर दिली आहे. नितीश कुमार यांनी आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांना 'नऊ मुले' असल्यावरून विनोद केला होता.

हेही वाचा - कोविड-१९ मॅनेजमेंटबाबत 'आयुष'चे आंतरराष्ट्रीय वेबिनार; जगातील पहिलाच प्रयोग

'मुख्यमंत्री नितीश कुमार आमच्यावर हल्ला चढवत असले तरी, ते जे काही बोलतील, ते आमच्यासाठी आशीर्वादाचेच असेल. आमच्यावर हल्ला करून ते अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत," असे ते म्हणाले.

'राजदचे एकमेव लक्ष्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, दारिद्र्य निर्मूलन करणे, कारखाने सुरू करणे आणि अन्नप्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे यावर आहे. बिहारमधील जनतेने राज्याशी संबंधित प्रश्नांना मतदान करण्याचे ठरविले आहे,' असे यादव पुढे म्हणाले.

2015 च्या तुलनेत विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये 55.69 टक्के इतके अंतिम मतदान झाले. कोविड - 19 च्या प्रादुर्भावाचे सावट असताना मतदार प्रथमच विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी घरांबाहेर पडले. बुधवारी पहिल्या टप्प्यातील मतदान घेण्यात आले. 71 विधानसभा मतदारसंघांत मतदानाचा पहिला टप्पा पार पडला.

हेही वाचा - उत्तर प्रदेशात उसाच्या शेतात सापडले नवजात अर्भक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.