लखनौ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (शनिवारी) अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना १ कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली. तसेच अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी योगी सरकारकडे केली. अयोध्येत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा - पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी 'जय हिंद'चा उल्लेख
भाजपशी संबध संपले असले तरी हिंदुत्वापासून दूर गेलो नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व आणि भाजप या दोन गोष्टी वेगळ्या असल्याचे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. “मला स्वप्नातही वाटलं नव्हत की, मी मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल', अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा - घाटकोपरमध्ये हिंगणघाट जळीतकांडातील आरोपीची प्रतिकात्मक होळी
ठाकरे म्हणाले की, राज्य सरकारकडून नाही तर माझ्या ट्रस्टकडून १ कोटी रुपये राम मंदिराच्या कामासाठी देणार आहोत. मंदिराच्या बांधकामासाठी ही आमच्याकडून छोटीशी मदत आहे. अयोध्येत येणे हा माझा सन्मान आहे. मी पहिल्यांदा जेव्हा अयोध्येत आलो, तेव्हा राम मंदिर कधी आणि कसे बनेल? हे नक्की नव्हते. मी भगवान श्रीरामांचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. मागील दीड वर्षात ही माझी तिसरी अयोध्या भेट असून मी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले.
हेही वाचा - ..तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारला कोणताच धोका नाही - अजित पवार
सुर्या नदीमध्येही मला स्नान करायचे होते. मात्र, संपूर्ण जगभर कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. कालच मी माझ्या राज्यातील लोकांना गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मी मंदिरात आरती करणार नाही. मात्र, मी पुन्हा अयोध्येत येईन, असे ठाकरे म्हणाले.