ETV Bharat / bharat

शिवेसेनेचे घूमजाव; म्हणे, बुरखाबंदी ही पक्षाची भूमिका नाहीच - नीलम गोऱ्हे - uddhav thackeray

साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यांनतर श्रीलंकेत बुरखाबंदी करण्यात आली. यानंतर 'रावणाच्या लंकेत जर बुरखाबंदी होऊ शकते तर, रामाच्या अयोध्येत का नाही?' अशी मागणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून केली होती. मात्र, आता ही पक्षाची भूमिका नसल्याची सारवासारव करण्यात येत आहे.

उद्धव ठाकरे
author img

By

Published : May 2, 2019, 1:33 PM IST

मुंबई - 'शिवसेना पक्षात जे अंतर्गत निर्णय घेतले जातात, त्यांच्यावरून पक्षाची भूमिका तयार होते. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे याचे अंतिम स्वरूप निश्चित करतात. ते स्वतः निर्णय घेतात. सामनामध्ये जे काही छापून आले आहे, ती पक्षाची भूमिका नाही. कदाचित, ज्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत, त्या संदर्भात ते लिहिणाऱ्यांचे वैयक्तिक मत असू शकते. मात्र, ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही,' असे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी भारतात बुरखाबंदीच्या मागणीविषयी स्पष्ट केले आहे.

नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या

साखळी बॉम्बस्फोट हल्ल्यांनतर श्रीलंकेत बुरखाबंदी करण्यात आली आहे. यानंतर 'रावणाच्या लंकेत जर बुरखाबंदी होऊ शकते तर, रामाच्या अयोध्येत का नाही?' अशी मागणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून करण्यात आली होती. मात्र, आता शिवसेनेतर्फे ही पक्षाची भूमिका नसून लिहिणाऱया व्यक्तीचे वैयक्तिक मत असल्याची सारवासारव करण्यात येत आहे.

'कोलंबोतील दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीलंकेत बुरखाबंदी करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी 'बुरखा' किंवा 'नकाब' परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करुन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस आणि धैर्याचे दर्शन घडवले असून रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार?,' असा सवाल उपस्थित करतानाच भारतातही बुरखाबंदी करावी, अशी मागणी शिवसेनेने सामनामधून केली होती. मात्र, आता चक्क घूमजाव करत ती पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

'बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. बुरख्याचा इस्लामशी काडीचाही संबंध नाही व भारतातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करत आहेत. अरबस्तानातील वाळवंट व उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली. राज्यातही पारा चढतो त्यावेळी तरुणी चेहर्‍यास ओढणी किंवा रुमाल गुंडाळूनच बाहेर पडतात. हे तेवढ्यापुरतेच असते. मात्र ‘नकाब’ किंवा ‘बुरखा’ घालणे हा जणू कुराणाचा आदेश आहे अशा भ्रमात किंवा अंधश्रद्धेत येथील मुसलमान वावरत आहेत,' असे शिवसेनेने म्हटले होते.

Intro:Body:

शिवेसेनेचे घूमजाव; म्हणे, बुरखाबंदी ही पक्षाची भूमिका नाहीच - नीलम गोऱ्हे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.