ETV Bharat / bharat

'म्हणाल ते करू फक्त सावत्रपणा करू नका'; अरविंद सावंतांचा मोदींवर निशाणा - अरविंद सावंत नरेंद्र मोदी अधिवेशन टीका

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. सोबतच त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना उपाययोजनांची संसदेला माहितीही दिली.

Arvind Sawant
अरविंद सावंत
author img

By

Published : Sep 20, 2020, 7:40 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आज संसदेमध्ये कोरोना संकट, अचानक लागू करण्यात आलेले लॉकडाऊन व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपाएतर राज्यांशी असलेल्या वागणुकीबद्दल केंद्र सरकारवर टीका केली. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांशी मोदींनी निधी व सोयीसुविधा देताना सावत्रपणाचा व्यवहार करू नये, असे सावंत म्हणाले. महाराष्ट्र कोरोनासोबत कसा लढत आहे याबाबतही त्यांनी माहिती दिली.

म्हणाल ते करू फक्त सावत्रपणा करू नका

पंतप्रधानांनी अचानक २४ मार्चला लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे काही तासातच लाखो लोक रस्त्यावर आले. सोशल डिस्टन्सिंगचा त्याच दिवशी बोजवारा उडाला होता. रेल्वे सेवाही बंद करण्यात आली. यात लाखो नागरिकांचे हाल झाले. पायी घरी जाताना अनेकांचे जीव गेले. नंतर रेल्वे सेवा सुरू केली तर अक्षरश: लोक गाड्यांखाली येऊन मरण पावले. हे सर्व टाळता आले असते जर पंतप्रधानांनी राज्यांना दोन दिवस अगोदर लॉकडाऊनची कल्पना दिली असती. मात्र, त्यांनी तसे केले नाही, अशी टीका सावंत यांनी केली.

सुरुवातीच्या काळात केंद्र सरकारने राज्यांना पीपीई कीट, व्हेंटीलेटर्सची मदत पुरवली नंतर मात्र, अचानक बंद केली. आतापर्यंत पंतप्रधानांनी जे सांगितले ते आम्ही केले आणि पुढेही करू मात्र, त्यांनी राज्यांना वाऱ्यावर सोडू नये. भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांना मदत करताना त्यांनी दुजाभाव करू नये, असे सावंत म्हणाले.

सावंतांनी महाराष्ट्रातील कोरोना लढ्याचा आढावाही घेतला. वरळी-कोळीवाडा आणि धारावीमध्ये राबवलेल्या गेलेल्या उपययोजनांची त्यांनी माहिती दिली. महाराष्ट्र देशातील सर्वात जास्त बाधित झालेले राज्य आहे मात्र, महाविकासआघाडी सरकार खंबीरपणे जनतेच्या पाठीशी उभे असल्याचे सावंत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.