भोपाळ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ट्विटरवरून कौतुक केले आहे. आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथांचे आभार मानले आहे.
मंगळवारी माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात आदिवासींचा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी आदिवासींच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिवराज सिहं यांनी केलेल्या मागण्या कमलनाथ यांनी मान्य केल्या. यानिमित्त शिवराज सिंह यांनी खास ट्विट करत कमलनाथांचे कौतुक केले. तसेच त्यांचे आभारही मानले. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, "आदिवासींच्या सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांनी विनाअट मान्य केल्या आहे. त्यामुळे सर्व आदिवासी बांधव खुश आहेत. हे आंदोलन यशस्वी झाल्याने मी आदिवासी बांधवांना शुभेच्छा देतो. मागन्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र कमलनाथ यांचेही मी आभार मानतो."
या मागण्या मान्य झाल्याच्या आनंदात शिवराज चौहान यांनी वियजी रॅली देखील काढली आहे.