नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मंत्री इमरती देवीवर आक्षेपार्ह टीपण्णी केली. यावरुन येथील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहले असून कमलनाथ यांना पक्षातून काढून टाकावे, अशी मागणी केली आहे.
कमलनाथ यांची टीपण्णी चुकीची आहे, असे जर सोनिया गांधींना वाटत असेल. तर त्यांनी कमलनाथ यांच्यावर कारवाई करायला हवी. सोनिया गाधींनी कोणतीच कारवाई केली नाही, तर काँग्रेस आणि सोनिया गांधींचे कमलनाथ यांना समर्थन आहे, असे स्पष्ट होईल, असे शिवराज सिंह म्हणाले.
कमलनाथ यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आणि या विरोधात दोन तास मौनव्रत धारण केले होते. तसेच आक्षेपार्ह टीपण्णीवर, काँग्रेसने माफी मागावी, असे बसपा प्रमुख मायावती यांनी देखील म्हटलं आहे.
-
1.मध्यप्रदेश में ग्वालियर की डाबरा रिजर्व विधानसभा सीट पर उपचुनाव लड़ रही दलित महिला के बारे में कांग्रेस के वरिष्ठ नेता व पूर्व सीएम द्वारा की गई घोर महिला-विरोधी अभद्र टिप्पणी अति-शर्मनाक व अति-निन्दनीय। इसका संज्ञान लेकर कांग्रेस आलाकमान को सार्वजनिक तौर पर माफी माँगनी चाहिए।
— Mayawati (@Mayawati) October 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">1.मध्यप्रदेश में ग्वालियर की डाबरा रिजर्व विधानसभा सीट पर उपचुनाव लड़ रही दलित महिला के बारे में कांग्रेस के वरिष्ठ नेता व पूर्व सीएम द्वारा की गई घोर महिला-विरोधी अभद्र टिप्पणी अति-शर्मनाक व अति-निन्दनीय। इसका संज्ञान लेकर कांग्रेस आलाकमान को सार्वजनिक तौर पर माफी माँगनी चाहिए।
— Mayawati (@Mayawati) October 19, 20201.मध्यप्रदेश में ग्वालियर की डाबरा रिजर्व विधानसभा सीट पर उपचुनाव लड़ रही दलित महिला के बारे में कांग्रेस के वरिष्ठ नेता व पूर्व सीएम द्वारा की गई घोर महिला-विरोधी अभद्र टिप्पणी अति-शर्मनाक व अति-निन्दनीय। इसका संज्ञान लेकर कांग्रेस आलाकमान को सार्वजनिक तौर पर माफी माँगनी चाहिए।
— Mayawati (@Mayawati) October 19, 2020
कमलनाथ यांनी आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आयटम हा काही अपमानजनक शब्द नाही. मला त्यावेळी त्यांचे नाव आठवत नव्हते. म्हणून मी म्हटले की त्या येथील आयटम आहेत. विधानसभेत ही यादी आल्यावर देखील आयटम नंबर-1 असे लिहिलेले असते, असे कमलनाथ म्हणाले.