ETV Bharat / bharat

2022 च्या निवडणुकीसाठी सर्व समाजवाद्यांनी एकत्रित यावे - शिवपाल सिंह यादव - शिवपाल सिंह यादव बातमी

ज्यावेळी 2022 मध्ये समाजवादीचे युती सरकार येईल त्यावेळी मला मुख्यमंत्री पद नको, असे म्हणत शिवपाल सिंह यादव यांनी समाजवादी पक्षासह युती करण्याची इच्छा वर्तवली आहे. 2018 साली शिवपाल सिंह यादव हे समाजवादी पक्षातून बाहेर पडत प्रगतिशील समाजवादी पक्षाची स्थापना केली होती.

shivpal sinh yadav
shivpal sinh yadav
author img

By

Published : Aug 16, 2020, 2:49 PM IST

इटावा (उत्तर प्रदेश) - प्रगतिशील समाजवादी पक्षचे (प्रसपा) प्रमुख शिवपाल सिंह यादव यांनी 2022 साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी समावादी पक्ष (सपा) तसेच समाजवाद्यांनी मिळून युती करावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर जनता जो निर्णय करेल त्याचा सन्मान करु, असे ते म्हणाले.

इटावा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये समाजवादी कार्यकर्त्यांचेही योगदान असून डॉ. राम मनोहर लोहिया यांनी या लढ्यात मोठे योगदान दिले.

यावेळी ते भाजपवर निशाणा साधत म्हणाले, राज्य व केंद्र सरकार जनतेचे शोषण करत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आपल्याला लढा द्यायचा आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यात सर्वजण एकत्रित आले होते. त्याप्रमाणेच आता भाजपच्या विरोधात सर्व समाजवाद्यांना एकत्रित यायचे आहे. ही लोकशाहीची लढाई लोकलाही पद्धतीने आपल्याला जिंकायची आहे.

शिवपाल यादव हे समाजवादी पक्षचे प्रमुख अखिलेश यादव यांचे काका आहेत. काही मतभेदानंतर त्यांनी 2018 साली समाजवादी पक्षातून बाहेर पडत आपला वेगळा पक्ष स्थापन केला होता. त्यांनतर त्यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली. यात भाजपचे डॉ. चंद्रसेन जादोन यांनी त्यांचा पराभव केला.

जर दोन्ही समाजवादी पक्ष व प्रगतिशील समाजवादी पक्षाने युती करत निवडणूक लढवली तर नक्कीच विजय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मला मुख्यमंत्री पदाची अपेक्षा नाही, असेही ते म्हणाले.

2017 साली झालेल्य विधानसभा निवडणुकीत भाजपने 300 हून अधिक जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती. तर समाजवादी पक्षला 403 पैकी केवळ 47 जागांवर समाधान मानावे लागले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.