ETV Bharat / bharat

शिवसेना एनडीएतून बाहेर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी केले जाहीर - शिवसेना काँग्रेस युती

शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह युती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षाच्या बाजूला जागा देण्यात येत आहे, असे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.

Pralhad Joshi statement about Sena
author img

By

Published : Nov 17, 2019, 5:26 PM IST

नवी दिल्ली - संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेना खासदारांची जागा बदलून, विरोधी पक्षांच्या बाजूला त्यांना नवीन जागा देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लोकसभेच्या पहिल्या रांगेतून तिसऱ्या रांगेमध्ये त्यांची जागा नेमण्यात आली आहे. तर, बाकी शिवसेना खासदारांचीही जागा बदलण्यात येत आहे.

शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच, शिवसेना आता महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह युती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांच्या खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षाच्या बाजूला जागा देण्यात येत आहे, असे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला सेना उपस्थित राहणार नाही असे शिवसेनेने काल (शनिवार) स्पष्ट केले होते. तसेच, विरोधी पक्षांसोबत युती करण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे, त्यांना विरोधी पक्षात जागा देणे ही नैसर्गिक बाब आहे, असेही जोशींनी पुढे म्हटले.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे शिवेसनेची एनडीएमधून हकालपट्टी केली जात आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे.

हेही वाचा : 'बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजप-शिवसेनेची व्हिडिओबाजी; सेनेला शहाणपण शिकवण्याची गरज नाही'

Intro:Body:

संसदेच्या सभागृहांमध्ये सेनेचे खासदार विरोधी पक्षात...

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला सेना उपस्थित राहणार नाही असे शिवसेनेने काल (शनिवार) स्पष्ट केले होते. तसेच, विरोधी पक्षांसोबत युती करण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे, त्यांना विरोधी पक्षात जागा देणे ही नैसर्गिक बाब आहे, असेही जोशी पुढे म्हटले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.