मुंबई -सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात आपले उमेदवार उतरवले आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेने आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना २३ जागा लढवणार आहे. तर बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २८ तारखेला पार पडणार आहे.
पहिल्या टप्प्यात तीन जागेवर शिवसेनेचे उमेदवार-
बिहार निवडणुकांचे मतदान हे तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान २८ तारखेला पार पडणार आहे. या टप्प्यात शिवसेना ३ मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानात 3 नोव्हेंबरला होणार आहे. यामध्ये शिवसेनेचे 9 उमेदवार आणि शेवटच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे, या टप्प्यात शिवसेनेने 11 ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांची उद्या(मंगळवारी) पाटण्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच आता बिहारमध्ये शिवसेना निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यानंतर तेथील उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून खासदार अनिल देसाई, कृपाल तुमाने आणि माजी खासदार-नेते चंद्रकांत खैरे हे बिहारला जाणार आहेत.
शिवसेना उमेदवारांची यादी-
पहिला टप्पा*
मनीष कुमार - पालीगंज
ब्युटी सिन्हा - गया शहर
मृत्युंजय कुमार - वजीरगंज
दुसरा टप्पा-
संजय कुमार - चिरैय्या
संजय कुमार - फुलपराश
संजय कुमार झा - बेनीपूर
रंजय कुमार सिंह - तरैय्या
विनिता कुमारी - अस्थवां
रवींद्र कुमार - मनेर
जयमाला देवी - राघोपुर
विनोद बैठा - भोरे
शंकर महसेठ - मधुबनी
तिसरा टप्पा-
प्रदीप कुमार सिंह - औराई
शत्रूघन पासवान - कल्याणपुर
सुभाषचंद्र पासवान - बनमंखी
नवीन कुमार मल्लीक - ठाकूरगंज
नंद कुमार - समस्तीपुर
पुष्पांकुमारी - सराय रंजन
मनीष कुमार - मोरवा
शिवनाथ मल्लीक - किशनगंज
चंदन कु. यादव - बहादुरगंज
गुंजा देवी - नरपरगंज
नागेंद्र चंद्र मंडल - मनिहारी
बिहार निवडणुकापूर्वी राज्यात सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यात तुलना करून महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून ते प्रकरण काढून घेत त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेनेने थेट बिहारच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. आता हे उमेदवार बिहारमध्ये शिवसेनेला कितपत यश मिळवून देतील हे येणाऱ्या निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.