ETV Bharat / bharat

'बाबरी निकालावर उत्सुकता ताणलेली, मात्र संयम बाळगा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा'

अयोध्येतील बाबरी जमीन वाद निकालावरून दोन्ही पक्षकारांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, संयम बाळगा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, असे आवाहन जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी जनतेला केले आहे.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Nov 8, 2019, 7:44 PM IST

नवी दिल्ली - अयोध्येतील बाबरी जमीन वाद निकालावरून दोन्ही पक्षकारांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, संयम बाळगा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, असे आवाहन जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी जनतेला केले आहे. याबाबतचे एक पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.

  • Delhi: Shahi Imam of Jama Masjid, Syed Ahmed Bukhari issues statement ahead of probable Ayodhya verdict, says 'Though passions on both sides are running high, but I would urge the Indian conscience to exercise restraint and demonstrate faith in the judiciary' pic.twitter.com/wYfrOWxgs3

    — ANI (@ANI) November 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
अयोध्या वादाप्रकरणी, माध्यमांमधील वाद विवाद कार्यक्रमांमध्ये कोण काय बोलत आहे, समाजामधील विविध घटकांमध्ये काय चर्चा सुरू आहे, महत्त्वाच्या व्यक्ती काय प्रतिक्रिया देत आहेत, यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे बुखारी यांनी सांगितले. या निकालात राज्यघटनेचे श्रेष्ठत्त्व जपले जाईल आणि कायदा सुवस्थेबाबात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
अयोध्या निकाल देशाची परीक्षा पाहणारा आहे. या निकालावरून सरकार कसे वागत आहे, याकडेही लक्ष ठेवून असल्याचे बुखारी यांनी सांगितले. राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादग्रस्त जमिनीविषयीचा निर्णय राखून ठेवत असल्याचे न्यायालयाने १६ ऑक्टोबरला म्हटले होते. सलग ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर आता या वादावर लवकरच निर्णय येणार आहे. १७ नोव्हेंबरला म्हणजेच सरन्यायाधीश गोगोई यांच्या कार्यकाळ संपायच्या आत या प्रकरणी निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची भेट घेतली. अयोध्या वादग्रस्त जमीन निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनाविषयी ही भेट झाली. अयोध्येमध्ये या आधीच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच भडकाऊ वक्तव्य करणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Intro:Body:

Shahi Imam of Jama Masjid, ayodhya result news, अयोध्या निकाल, अयोध्या बाबरी जमीन वाद,  जामा मशिद शाही इमाम बातमी, राम जन्मभुमी वाद

'बाबरी निकालावर उत्सुकता ताणलेली, मात्र संयम बाळगा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा'

नवी दिल्ली -  अयोध्या बाबरी जमीन वाद निकालावरून दोन्ही पक्षकारांमध्ये उत्सुकता आहे. मात्र, संयम बाळगा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा, असे आवाहन जामा मशिदीचे शाही इमाम सईद अहमद बुखारी यांनी जनतेला केले आहे. याबाबतचे एक पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे.

अयोध्या वादाप्रकरणी, माध्यमांमधील वाद विवाद कार्यक्रमांमध्ये कोण काय बोलत आहे, समाजामधील विविध घटकांमध्ये काय चर्चा सुरू आहे, महत्त्वाच्या व्यक्ती काय प्रतिक्रिया देत आहेत, यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे बुखारी यांनी सांगितले. या निकालात राज्यघटनेचे श्रेष्ठत्त्व जपले जाईल आणि कायदा सुवस्थेबाबात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.    

अयोध्या निकाल देशाची परीक्षा पाहणारा आहे. या निकालावरून सरकार कसे वागत आहे, याकडेही लक्ष ठेवून असल्याचे बुखारी यांनी सांगितले.

राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादग्रस्त जमिनीविषयीचा निर्णय राखून ठेवत असल्याचे न्यायालयाने १६ ऑक्टोबरला म्हटले होते. सलग ४० दिवस सुनावणी झाल्यानंतर आता या वादावर लवकरच निर्णय येणार आहे. १७ नोव्हेंबरला म्हणजेच सरन्यायाधीश गोगोई यांच्या कार्यकाळाच्या संपायच्या आत या प्रकरणी निर्णय होण्याची शक्यता आहे.     

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची भेट घेतली. अयोध्या वादग्रस्त जमीन निकालाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियोजनाविषयी ही भेट झाली. अयोध्येमध्ये या आधीच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच भडकाऊ वक्तव्य करणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.