ETV Bharat / bharat

शाहीन बाग आंदोलन: दिल्लीतील नोयडा फरीदाबाद रस्ता ७१ दिवसांनतर पुर्ववत

नोयडा- फरीदाबाद-दिल्ली रस्ता तब्बल ७१ दिवसानंतर एका बाजूने खुला झाला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शाहीन बाग येथे आंदोलन करणाऱ्यांमुळे हा रस्ता बंद होता.

कालिंदी रोड
कालिंदी रोड
author img

By

Published : Feb 22, 2020, 7:39 PM IST

नवी दिल्ली : नोयडा- फरीदाबाद-दिल्ली रस्ता तब्बल ७१ दिवसानंतर एका बाजूने खुला झाला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शाहीन बाग येथे आंदोलन करणाऱ्यांमुळे हा रस्ता बंद होता. त्यामुळे नागरिकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याा नऊ नंबर रस्त्याची एक बाजू वाहतूकीसाठी खुली झाली आहे. त्यामुळे कालिंदी भागाकडे नागरिकांना जाता येणार आहे.

दिल्लीतील नोयडा फरीदाबाद रस्ता ७१ दिवसांनतर पुर्ववत

सीएए विरोधी आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ३ मध्यस्थींचीही नियुक्ती केली आहे. शाहीन बाग येथे सुरु असलेल्या आंदोलनांमुळे दिल्लीला फरिदाबाद आणि नोयडा या भागांना जोडणारा रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला होता. संजय हेगडे आणि साधना रामचंद्रन यांनी यासंबधी आंदोलकांशी चर्चा करत आहेत. जसा आंदोलन करण्याचा हक्क आहे, तसा रस्ता वापरण्याचा सर्वसामान्य नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे आंदोलन दुसऱ्या ठिकाणी करावे, ज्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, असे साधना रामचंद्रन यांनी आंदोलकांना सांगितले.

याप्रकरणी अद्याप तोडगा निघाली नाही. आंदोलकांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी आंदोलकांनी रोखले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.