ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेशात खोदकामादरम्यान सापडली व्हिक्टोरियाकालीन नाणी - Archaeological dept

आपली आजी लखवंती देवी यांची ही नाणी असल्याचे जमिनीचे मालक मोतीलाल यांचे म्हणणे आहे. 1936 साली गंगा नदीला पूर आला होता. तेव्हा या जागेवर असलेले त्यांच्या आजीचे घर पूर्ण वाहून गेले होते. यामध्ये यांच्या आजीचे निधनही झाले. त्यामुळे ही नाणी आपल्या आजीची असण्याचीच शक्यता अधिक आहे, असे मोतीलाल म्हणाले.

उत्तर प्रदेशात खोदकामादरम्यान सापडली व्हिक्टोरियाकालीन नाणी

author img

By

Published : May 9, 2020, 2:50 PM IST

मिर्झापूर - चुनार पोलीस ठाणे क्षेत्रातील सोनपूर गावात जमिनीचे खोदकाम करताना व्हिक्टोरिया कालीन चांदीची नाणी सापडली आहेत. त्यानंतर गावात खळबळ उडाली होती. तसेच, या नाण्यांच्या मालकीवरूनही जोरदार वादावादी झाली. यानंतर उपजिल्हाधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहोचत ही नाणी आपल्या ताब्यात घेतली.

उत्तर प्रदेशात खोदकामादरम्यान सापडली व्हिक्टोरिया कालीन नाणी
उत्तर प्रदेशात खोदकामादरम्यान सापडली व्हिक्टोरिया कालीन नाणी
उत्तर प्रदेशात खोदकामादरम्यान सापडली व्हिक्टोरियाकालीन नाणी
उत्तर प्रदेशात खोदकामादरम्यान सापडली व्हिक्टोरियाकालीन नाणी

मोतीलाल यांच्या जमिनीचे खोदकाम सुरू होते. पोकलँड मशीनद्वारे खोदकाम चालू असताना हि विक्टोरिया कालीन चांदीची नाणी चालकाला दिसली. यानंतर त्याने खोदकाम बंद करून कुतुहलाने ही नाणी गोळा करून पाहिली. खोदकाम थांबल्याने जमिनीचे मालक मोतीलाल या जागी पोहोचले. पोकलँड चालक आणि मोतीलाल यांच्यात या नाण्यांच्या मालकीवरून जोरदार वादावादी सुरू झाली. यामुळे ही बाब आजूबाजूच्या लोकांना समजली.

या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचत लोकांना पांगवले. कालच्या या घटनेनंतर रात्रभर गावात पोलीस बंदोबस्त होता. आज उपजिल्हाधिकारी जंगबहादुर यादव यांनी घटनास्थळी पोहोचून ही नाणी ताब्यात घेतली.

व्हिक्टोरिया कालीन सात नाणी

या नाण्यांवर 1862 1877 1878 1900 आणि 1904 1905 अशी सालांची नोंद आहे. जिल्हाधिकार्‍यांनी सात नाणी ताब्यात घेतली आहेत. तसेच, येथील ग्रामस्थ काही नाणी घेऊन गेलेत का, याविषयी चौकशी सुरू आहे.

ही नाणी आपल्या आजीची - जमीन मालक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.