ETV Bharat / bharat

सय्यद अली शाह गिलानीने दिला हुर्रियत कॉन्फरन्सचा राजीनामा - hurriyat conference

काश्मीरमधील फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांनी हुर्रियत कॉन्फरन्सचा राजीनामा दिला आहे. पत्रात गिलानी यांनी कॉन्फरन्समधील लोकांमध्ये शिस्तीचा अभाव, सदस्यपदाच्या असंवैधानिक कामकाज हे राजीनामा देण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.

Geelani quits Hurriyat
सय्यद अली शाह गिलानी
author img

By

Published : Jun 29, 2020, 3:19 PM IST

श्रीनगर - काश्मीरमधील फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांनी हुर्रियत कॉन्फरन्सचा राजीनामा दिला आहे. हुर्रियत कॉन्फरन्सची सद्यपरिरस्थिती पाहता राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मी हुर्रियत कॉन्फरन्सच्या सर्वांना मी चीठ्ठी लिहून माहिती दिली आहे.

पत्रात गिलानी यांनी कॉन्फरन्समधील लोकांमध्ये शिस्तीचा अभाव, सदस्यपदाच्या असंवैधानिक कामकाज हे राजीनामा देण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर कॉन्फरन्सने काश्मीरी जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी कोणतीही सक्रिय भूमिका निभावली नाही. मी राजीनामा दिला आहे. परंतु, लोकांसाठी मी पुढेही काम करत राहीन, असे त्यांनी म्हटलं आहे.

Geelani quits Hurriyat
सय्यद अली शाह गिलानी यांनी दिला हुर्रियत कॉन्फरन्सचा राजीनामा....

हेही वाचा... चीनबरोबर तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताचे अमेरिका, रशियाबरोबरचे संरक्षण संबंध प्रकाशझोतात

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून आता एक वर्ष पूर्ण होत आहे. भारत सरकारच्या मोठ्या निर्णयानंतरही काश्मीरमध्ये कॉन्फरन्सकडून हालचाली न झाल्याने पाकिस्तान स्थित संघटनांकडून त्यांना टीकेला सामोरे जावे लागले, अशी माहिती आहे.

2001 मध्ये हुर्रियतची स्थापना झाली. तेव्हा पासून कॉन्फरेन्ससाठी कार्यरत आहेत. 370 कलम रद्द केल्यानंतर सय्यद अली शाह गिलानी यांना श्रीनगरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.