नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सहाय्य आणि वैश्विक आर्थिक वृद्धिला प्रोत्साहन दिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाने 'सियोल पीस पुरस्कार' प्रदान केला. दक्षिण कोरियाच्या सियोल येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमामध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान मोदी यांच्यावरील एका लघुपटाचेही प्रदर्शन यावेळी करण्यात आले.
भारतासह वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धी करण्यात मोदी यांचा मोलाचा वाटा होता. श्रीमंत आणि गरीब लोकांमधील दरी कमी करण्यामध्येही 'मोदीनॉमिक्स'ने महत्वपूर्ण काम केले, असे पुस्कार प्रदान करते वेळी आयोजकांनी म्हटले. तर, स्थानिक तसेच वैश्विक शांततेसाठी मोदी यांनी दिलेल्या योगदानालाही आयोजकांनी श्रेय दिले.
सियोल पीस पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे १४वे व्यक्ती आहेत. यापूर्वी संयुक्त राष्ट्राचे महासचिव कोफी अन्नान, जर्मनीचे व्हॉईस चांसलर एंजेला मार्केल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सियोल येथील १९९०च्या ऑलंपिक स्पर्धेपासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी मिळालेला हा पुसस्कार हा देशातील जनतेला प्रदान केला आहे. भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे पुरस्कार स्विकारताना त्यांनी म्हटले. या पुरस्काराअंतर्गत मिळालेली सर्व रक्कम पंतप्रधान मोदी यांनी 'नमामी गंगे' योजनेला समर्पित केली आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)