ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : 'त्यांना पाकिस्तान अन् डोकलाम सीमेवर लढण्यास पाठवा'

दोषींना फाशी देऊ नका. ते देशाची सेवा करण्यास तयार आहेत. त्यांना पाकिस्तान किंवा डोकलाम सीमेवर लढण्यास पाठवा', असे दोषींचे वकिल ए. पी. सिंह म्हणाले.

Send Nirbhaya convicts to India-Pak border but don't hang them: Lawyer

author img

By

Published : Mar 19, 2020, 11:11 PM IST

नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना उद्या पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात येणार आहे. कायद्यातील सर्व पळवाटा संपल्यामुळे उद्या दोषींना फाशी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 'चौघांना फाशी देऊ नका, ते देशाची सेवा करण्यास तयार आहेत. त्यांना पाकिस्तान किंवा डोकलाम सीमेवर लढण्यास पाठवा', असे मत दोषींचे वकील ए. पी. सिंह यांनी व्यक्त केले आहे.

'दोषींना फाशी देऊ नका. ते देशाची सेवा करण्यास तयार आहेत. त्यांना पाकिस्तान, डोकलाम सीमेवर लढण्यास पाठवा. चौघांनाही न्याय मिळाला नाही. देशामध्ये महिला आयोग, महिला हेल्पलाइन क्रमांक आहेत. मात्र, पुरुष आयोग नाहीत. जर पुरुष आयोग असता तर आम्हाला न्याय मिळाला असता, असे ए. पी. सिंह म्हणाले.

निर्भया प्रकरण : 'त्यांना पाकिस्तान अन् डोकलाम सिमेवर लढण्यास पाठवा'

दरम्यान निर्भयाच्या वकील सीमा कुशवाह यांनी दोषींना फाशी देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला. 'मला खात्री आहे की, उद्या सर्व पहाटे साडेपाच वाजता सर्व चारही दोषींना फाशी देण्यात येईल', असे त्या म्हणाल्या.

डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.