ETV Bharat / bharat

देशभरात आज दिवसभरात काय होणार; जाणून घ्या एका क्लिकवर... - happy birthday tamanna bhatia

देश, जग, खेळ, मनोरंजन आणि राजकारणात काय घडणार, 'ईटीव्ही भारत'वर संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

see-breaking-news-today-across-the-country
देशभरात आज दिवसभरात काय होणार; जाणून घ्या एका क्लिकवर...
author img

By

Published : Dec 21, 2020, 4:05 AM IST

Updated : Dec 21, 2020, 5:37 AM IST

आज गुरु-शनी ग्रह येणार सर्वात जवळ, तब्बल 400 वर्षांनी येतो हा योग

आज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत पश्चिम क्षितीजावर गुरु आणि शनी या दोन ग्रहांची महायुती बघायला मिळणार आहे. आकाशातील युती म्हणजे दोन ग्रह किंवा तारे हे आकाशात जवळ दिसणं होय. सुमारे 400 वर्षांनी गुरु आणि शनी ग्रहांच्या महायुतीचा योग आला आहे. आजचा योग चुकला तर पुन्हा आपल्याला 2080 पर्यंत हे पाहण्यासाठी थांबावे लागेल. खगोल संस्था तसेच अभ्यासक यांच्या मदतीने खगोल दुर्बिणीतून ही महायुती पाहता येईल.

see-breaking-news-today-across-the-country
गुरु-शनी ग्रह येणार सर्वात जवळ (फोटो : नासा)

शेतकरी आंदोलनाचा आज २६ वा दिवस

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे पारित केले आहेत. हे कायदे रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी पंजाब हरियाणा या राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आजचा या आंदोलनाचा २६ वा दिवस आहे. केंद्र सरकारने याविषयावर चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांना पत्राद्वारे निमंत्रण दिले आहे. यात 40 हून अधिक संघटनाना हे पत्र पाठवण्यात आले आहे.

शेतकरी आंदोलन

बाळासाहेब सानप आज भाजपामध्ये करणार प्रवेश

माजी आमदार बाळासाहेब सानप हे आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

बाळासाहेब सानप

आरोग्य सेविकांचा आज आझाद मैदानात मोर्चा

किमान वेतनाच्या मागणीसाठी मुंबईतील चार हजार आरोग्य सेविका आज आझाद मैदानात धरणे धरणार आहेत. किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व घरभाडे भत्ता आरोग्य सेविकांना कायद्याने दिलेले असताना मुंबई पालिका प्रशासन त्याची अंमलबजाववणी करत नसल्यामुळे प्रलंबित मागण्यासाठी त्यांनी मोर्चाची हाक दिली आहे.

मुंबई महानगरपालिका

केंद्रीय पथक करणार आज मराठवाड्याची पाहणी

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. या पथकामध्ये सहा जणांचा समावेश असून, आज ते पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहे.

केंद्रीय पथक

मुंबईत आजपासून 9 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला सुरूवात

वारकरी साहित्य परिषदेकडून घेण्यात येणारे 9 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून मुंबईच्या हॉटेल नोव्हेटेलमध्ये सुरूवात होणार आहे. हे संमेलन दोन दिवसांचे असून याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, नाना पटोले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि माजी राज्यपाल डी. वाय. पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. उद्या २२ डिसेंबर रोजी सांगता सोहळा पार पडणार आहे.

वारकरी साहित्य परिषद

उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात

उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. हे अधिवेशन तीन दिवसाचे असणार आहे. यात ४ हजार करोडहून अधिक रुपयांच्या कामांचे बजेट पास केले जाणार आहेत. तसेच या अधिवेशनच्या पहिल्या दिवशी दिवंगत आमदार सुरेंद्र सिंह जीना आणि माजी चार आमदार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धाजंली अर्पित केली जाणार आहे.

उत्तराखंड विधानसभा

आयएसएल (ISL): बंगळुरू-मोहन बागान यांच्यात आज सामना

हिरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) मध्ये आज गतविजेता एटीके मोहन बागान आणि बंगळुरू एफसी यांच्यात सामना होणार आहे. हा सामना जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. एकीकडे एटीकेएमबीचे आक्रमण आणि बचावफळी मजबूत आहे. तर दुसरीकडे बंगळुरू संघाने देखील या हंगामात दमदार कामगिरी नोंदवली आहे. बंगळुरूचा संघ या हंगामात एकही सामना गमावलेला नाही. यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

बंगळुरू-मोहन बागान यांच्यात आज सामना

अभिनेत्री तमन्नाचा आज वाढदिवस

बॉलीवूड आणि साऊथ अभिनेत्री तमन्ना भाटियाचा आज वाढदिवस. तिने आधी साऊथ आणि मग बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली. तमन्नाने वयाच्या 15 व्या वर्षी आपल्या करिअरची सुरूवात केली होती. 'चांद सा रोशन चेहरा' या हिंदी चित्रपटातून तिने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. महत्वाचे म्हणजे, तमन्नाचा हा चित्रपट दणकून आपटला. यानंतर तिने काही व्हिडिओ अल्बममध्ये काम केलं. नंतर तेलगू व तामिळ चित्रपटांकडे वळली. 2005 मध्ये तिने 'श्री' या चित्रपटात काम केले. यानंतर एकापाठोपाठ एक तामिळ चित्रपटांनंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

तमन्ना भाटिया

अभिनेता गोविंदाचा आज वाढदिवस

बॉलीवूडचा डान्सिंग स्टार अशी ओळख असलेल्या गोविंदाचा आज वाढदिवस. 21 डिसेंबर 1963 रोजी विरारमध्ये गोविंदाचा जन्म झाला. आज त्याचा 56 वाढदिवस साजरा होत आहे. आपल्यातील उत्तम भूमिका कौशल्य, डान्स आणि कॉमेडीने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. गोविंदाने आपल्या करिअरची सुरुवात 'डिस्को डान्सर' या सिनेमापासून केली. गोविंदाची भूमिका असलेला चित्रपट 'इल्जाम' हा चित्रपट 1986 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अभिनयाने गोविंदाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याकाळी हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातून गोविंदाची डान्सिंग स्टार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली.

गोविंदा

Last Updated : Dec 21, 2020, 5:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.