- पंतप्रधान मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष यांच्यात आज व्हर्चुअल बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव शुक्रवारी डिजिटल माध्यमातून एक बैठक घेणार आहेत. दरम्यान हे दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करतील. तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर मत व्यक्त करतील. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली.
![नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_modi.jpg)
- पश्चिम बंगाल: राज्यपाल जगदीप धनखर आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतील
कोलकाता- पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, राज्य सरकार त्यांच्या इशाऱ्यानंतरही कारवाई करण्यात अपयशी ठरले. दरम्यान, आज राज्यपाल जगदीप धनकर आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतील. यामध्ये ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे
![राज्यपाल जगदीप धनखर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_jagdeep.jpg)
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'अंतरराष्ट्रीय भारती महोत्सव-2020' ला संबोधित करतील
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 04:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आंतरराष्ट्रीय भारती महोत्सव 2020 ला संबोधित करतील. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, महाकवी सुब्रमण्य भारती यांची 138 वी जयंती साजरी करण्यासाठी वनवासी सांस्कृतिक केंद्रातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
![पंतप्रधान मोदी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_pm.jpg)
- दुमका ट्रेझरी प्रकरणात आज लालू यादव यांच्या जामीन अर्जावर सुनावणी
चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर आरजेडी सुप्रीमो लालू यादव सध्या तुरूंगात आहेत. शुक्रवारी झारखंड उच्च न्यायालयात त्याच्या वतीने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. जर त्यांना आज होईकोर्टच्या वतीने जामीन मिळाला तर त्यांच्या तुरूंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा होईल कारण चारा घोटाळ्याच्या बहुतांश घटनांमध्ये त्यांना आधीच जामीन मिळाला आहे.
![लालू यादव](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_lalu.jpg)
- आज शेतकरी आंदोलनाचा 16 वा दिवस
कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 16 वा दिवस आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात संघर्ष वाढत आहे. कृषी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शेतकरी नेते म्हणाले.
![शेतकरी आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_farmer.jpg)
- आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशीची शक्यता
मनी लाँडरिंग संदर्भात चौकशी करत असलेल्या ईडीकडून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांच्या चौकशीची शक्यता आहे. यापुर्वी त्यांना ४ वेळा समन्स पाठवण्यात आल्यानंतरही ते चौकाशीसाठी हजर झाले नव्हते.
![अंमलबजावणी संचालनालय (ईडी)](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_ed.jpg)
11 डिसेंबर रोजी दवाखाने बंद राहणार; आएमएची राष्ट्रव्यापी बंदची हाक
मुंबई: केंद्र सरकारने आयुर्वेदाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या 11 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. यावेळी त्यांनी उद्या दिवसभर सर्व दवाखाने बंद राहणार असल्याचं जाहीर केलं असून डॉक्टरांनीही दवाखाने बंद ठेवण्याचं आवाहन आयएमएने केलं आहे. त्यामुळे उद्या रुग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
![इंडियन मेडिकल असोसिएशन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_docter.jpg)
- आज 11 डिसेंबरपर्यंत तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात 'ही' रक्कम जमा असणं आवश्यक
पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये कमीतकमी शिल्लक 500 रुपये जमा असणं आवश्यक आहे. आज म्हणजेच 11 डिसेंबरपर्यंत तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यात ही रक्कम जमा असणं आवश्यक आहे.
याआधी इंडिया पोस्टने त्यांच्या ग्राहकांना याबाबत आठवण करून देणारा मेसेज देखील पाठवला होता. पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स असणं अनिवार्य आहे, असं या मेसेजमधून सांगण्यात आलं होतं. जर तुम्हाला मेंटेनन्स चार्ज द्यायचा नसेल तर 11 डिसेंबर 2020 आधी तुमच्या खात्यामध्ये कमीतकमी 500 रुपये जरुर मेंटेन करा.
![पोस्ट ऑफिस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_post.jpg)
- आज ड्रग्स प्रकरणात रकुलप्रीतच्या याचिकेवर सुनावणी
ड्रग्स प्रकरणात मीडिया रिपोर्टिंगवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री रकुलप्रीत यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय सुनावणी घेऊ शकते.
![अभिनेत्री रकुलप्रीत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_rukulpritsinh.jpg)
- हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचा आज 98 वा वाढदिवस
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आज 11 तारखेला आपला 98 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.
![दिलीप कुमार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9837410_dilip.jpg)