नवी दिल्ली - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला आज (बुधवारी) दिल्लीमध्ये आणण्यात आले आहे. त्याला पटियाला हाऊस न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
शरजील इमामला पटियाला हाऊस न्यायालयात आणणार; न्यायालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त - शरजील इमाम
दिल्ली पोलीस शरजील इमामच्या पोलीस कोठडीची मागणी करू शकतात. काल (मंगळवारी) त्याला ट्रान्झिट रिमांड देण्यात आली होती.
नवी दिल्ली - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला आज (बुधवारी) दिल्लीमध्ये आणण्यात आले आहे. त्याला पटियाला हाऊस न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
शरजील इमामला पटियाला हाऊस न्यायालयात आणणार; न्यायालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त
नवी दिल्ली - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला आज(बुधवारी) दिल्लीमध्ये आणण्यात आले आहे. त्याला पटियाला हाऊस न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायलयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
दिल्ली पोलीस शारजील इमामच्या पोलीस कोठडीची मागणी करू शकतात. काल(मंगळवारी) त्याला ट्रान्झिट रिमांड देण्यात आली होती. त्यामुनार आज बिहारमधून त्याला दिल्लीला आणण्यात आले आहे. देशविरोधी वक्तव्य केल्यामुळे शारजील इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशविरोधी वक्तव्य केल्याबाबतचे दोन व्हिडिओ दिल्ली पोलीसांना मिळाले होते. त्यानुसार त्याच्यावर दिल्लीसह उत्तर प्रदेश, आसाम, मनिपूर आणि बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल शारजील इमामला अटक केल्यानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आसाम राज्याला भारतापासून वेगळे करायला पाहिजे असे वक्तव्य त्याने केले होते.