नवी दिल्ली - फ्रान्समधील राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारतात पोहोचली आहे. फ्रान्समधून नॉन-स्टॉप उड्डाण केल्यावर बुधवारी रात्री आठ वाजता राफेल विमानेची दुसरी तुकडी भारतात दाखल झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने बुधवारी दिली.
फ्रान्समधील इस्ट्र्रेसहून गुजरातमधील जामनगर येथे तीन नवीन विमाने दाखल झाली. या प्रवासादरम्यान फ्रेंच एअर फोर्सचे उड्डाणादरम्यान इंधन भरणारे (मिड एयर रिफ्यूलिंग) विमानही सोबत होते. फ्रान्समधील सेंट डायझियर रॉबिन्सन एअरबेसवर या प्रवासासाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आले होते.
सहायक चीफ ऑफ एअर स्टाफ (प्रोजेक्ट) यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची टीम तीन लढाऊ विमान घेण्यासाठी लॉजिस्टिक मुद्द्यांवर समन्वय साधत आहे.
हेही वाचा - सैन्यामध्ये कुशल मनुष्यबळासाठी जवानांचे निवृत्ती वय वाढवण्याचा प्रस्ताव
या तीन नवीन विमानांच्या आगमनानंतर भारताकडे एकूण आठ राफेल विमान आहेत. यापूर्वी 29 जुलै रोजी पाच राफेल विमाने आली होती. 10 सप्टेंबरला अंबाला येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना 'गोल्डन अॅरो स्क्वॉड्रन' मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.
जेव्हा राफेल यांचा पहिला ताफा हवाई दलात दाखल झाला, तेव्हा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या विमानाला 'गेम चेंजर' म्हटले होते. राफेलसह हवाई दलाने तंत्रज्ञानाची धारही मिळविली असल्याचा दावा त्यांनी केला होता.
सिंह म्हणाले होते की, 'माझा विश्वास आहे की आमच्या हवाई दलाने राफेलबरोबर तांत्रिक प्रगतीही साधली आहे.'
राफेल हे 4.5 पिढीचे विमान आहे आणि यामध्ये अद्ययावत शस्त्रे, अधिक चांगले सेन्सर्स आहेत.
हेही वाचा - दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट; मुख्यमंत्री केजरीवालांची कबुली