नवी दिल्ली/लीड्स - आयसीसी विश्वकरंडकातील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान हेडिंग्ले मैदानाच्या वरून एक विमान गेले. या विमानातून 'जस्टिस फॉर बलुचिस्तान' आणि 'हेल्प एण्ड एन्फोर्स्ड डिसअॅपिअरन्स इन पाकिस्तान' असे मोठ्या अक्षरात लिहिलेले बॅनर्स सोडण्यात आले होते. यानंतर अफगाण-पाक संघांचे चाहते मैदानाबाहेरच एकमेकांशी भिडले. या हाणामारीत दोन्ही देशाच्या चाहत्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही झाले.
-
#WATCH: A scuffle breaks out between Pakistan and Afghanistan fans outside Headingley Cricket Ground in Leeds after an aircraft was flown in the area which had 'Justice for Balochistan' slogan. Leeds air traffic will investigate the matter. pic.twitter.com/mN8yymQOP5
— ANI (@ANI) June 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH: A scuffle breaks out between Pakistan and Afghanistan fans outside Headingley Cricket Ground in Leeds after an aircraft was flown in the area which had 'Justice for Balochistan' slogan. Leeds air traffic will investigate the matter. pic.twitter.com/mN8yymQOP5
— ANI (@ANI) June 29, 2019#WATCH: A scuffle breaks out between Pakistan and Afghanistan fans outside Headingley Cricket Ground in Leeds after an aircraft was flown in the area which had 'Justice for Balochistan' slogan. Leeds air traffic will investigate the matter. pic.twitter.com/mN8yymQOP5
— ANI (@ANI) June 29, 2019
-
#Justice for #Balochistan#EndEnforcedDisappearances in #Pakistan pic.twitter.com/Su18ereF7T
— WBO (@WorldBalochOrg) June 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Justice for #Balochistan#EndEnforcedDisappearances in #Pakistan pic.twitter.com/Su18ereF7T
— WBO (@WorldBalochOrg) June 29, 2019#Justice for #Balochistan#EndEnforcedDisappearances in #Pakistan pic.twitter.com/Su18ereF7T
— WBO (@WorldBalochOrg) June 29, 2019
विमानातून सोडण्यात आलेल्या बॅनर्सच्या माध्यमातून बलुची चळवळीच्या कार्यकर्त्यांद्वारे पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. पाकिस्तानकडून बलुची नागरिकांच्या मानवाधिकारांची पायमल्ली केली जात असल्याच्या विरोधात ही प्रचार मोहीम विश्व करंडक स्पर्धेदरम्यान राबवण्यात येत आहे. 'बलोच रिपब्लिकन पार्टी आणि जागतिक बलोच संघटनेद्वारे पाकिस्तानविरोधात जागरूकता अभियान राबवण्यात येत आहे. पाकिस्तानकडून दिवसाढवळ्या बलुची चळवळीतील कार्यकर्त्यांना नाहीसे करण्यात येत आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी या बॅनर्सद्वारे प्रचार करण्यात आला. बळाचा वापर करून जाणीवपूर्वक बलुची कार्यकर्त्यांना नाहीसे करण्याचे प्रकार थांबावेत, यासाठी पाकविरुद्ध अफगाण सामन्यादरम्यान या मार्गाचा वापर करण्यात आला,' असे ट्विट जागतिक बलोच संघटनेने केले आहे.
-
The voices of the oppressed cannot be suppressed forever, we will paint our message in the skies if we have to!. #Balochistan
— WBO (@WorldBalochOrg) June 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Low flying Banner trailing plane during #PAKvAFG world cup clash calls to #EndEnforcedDisappearances in Pakistan. pic.twitter.com/Y17VmFdDCq
">The voices of the oppressed cannot be suppressed forever, we will paint our message in the skies if we have to!. #Balochistan
— WBO (@WorldBalochOrg) June 29, 2019
Low flying Banner trailing plane during #PAKvAFG world cup clash calls to #EndEnforcedDisappearances in Pakistan. pic.twitter.com/Y17VmFdDCqThe voices of the oppressed cannot be suppressed forever, we will paint our message in the skies if we have to!. #Balochistan
— WBO (@WorldBalochOrg) June 29, 2019
Low flying Banner trailing plane during #PAKvAFG world cup clash calls to #EndEnforcedDisappearances in Pakistan. pic.twitter.com/Y17VmFdDCq
'पाकिस्तानी लष्कर आणि राज्यकर्त्यांकडून कित्येक दशकांपासून बलुची नागरिकांवर अत्याचार केले जात आहेत. यातून सुटका व्हावी, बलुची जनतेला न्याय मिळावा, यासाठी जागतिक पातळीवर आवाहन करण्यात आले. जागतिक संघटनेकडेही 'जस्टिस फॉर बलुचिस्तान'ची मागणी लावून धरण्यात आली आहे. यासाठी पावले उचलण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. तसेच, बळाचा वापर करून जाणीवपूर्वक बलुची कार्यकर्त्यांना नाहीसे करण्याचे प्रकार थांबावेत, यासाठी 'हेल्प एण्ड एन्फोर्स्ड डिसअॅपिअरन्स इन पाकिस्तान' हेही अभियान सुरू आहे,' असे दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
'या विमानाच्या भरारीनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हे विमान अनधिकृत होते. त्यांनी राजकीय हेतूने प्रेरित संदेश बॅनरच्या माध्यमातून झळकवले होते. लीडस एअर ट्रॅफिक या प्रकाराची चौकशी करणार आहे,' अशी माहिती आयसीसीच्या सूत्रांनी दिली.
'पाकिस्तानात मानवाधिकारांची होणारी पायमल्ली, तेथील अत्यंत वाईट परिस्थिती जगासमोर आणण्यासाठी आम्ही आमचे अभियान सुरूच ठेवू,' असे बलुची संघटनांनी म्हटले आहे. तसेच, आमच्या अधिकारांच्या प्रामाणिक मागणीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याआधी त्यानी बर्मिंगहॅमच्या रस्त्यांवर 'हेल्प एण्ड एन्फोर्स्ड डिसअॅपिअरन्स इन पाकिस्तान' असे फलक लावले होते. लंडनमध्ये लॉर्डस स्टेडिअमवरही त्यांनी अशाच प्रकारे पाकिस्तानचा निषेध केला होता. या वेळी, पाकिस्तान आणि साऊथ आफ्रिकेचा सामना सुरू होता.
दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी बलुची कार्यकर्त्यांनी लावलेली पोस्टर्स फाडून टाकली. ते 'पाकिस्तानी लष्कर चिरायू होवो,' अशा घोषणाही देत होते.