ETV Bharat / bharat

कोरोना व्हायरस: दिल्लीत मास्कचा तुटवडा, मागणी वाढल्याने काळाबाजार सुरू

दिडशे रुपयांना मिळणारे मास्कची किंमत आता ४०० रुपये असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 4, 2020, 6:48 PM IST

Updated : Mar 4, 2020, 7:16 PM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कारोनाचा प्रसार वाढत असून भारतातही २८ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी दिल्ली आणि परिसरामध्ये तोंडाला लावण्याच्या मास्कची मागणी वाढली आहे. मात्र, मेडिकल स्टोअरमध्ये मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात मास्कचा काळाबाजार सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - कोरोना व्हायरस: दिल्लीत मास्कचा तुटवडा, मागणी वाढल्याने काळाबाजार सुरू

दिल्लीतील बख्तावरपूर परिसरात मेडिकलमध्ये नागिकांना मास्क मिळत नाहीत. सुरुवातील मास्कची विक्री कमी होती. मात्र, आता मास्कची मागणी वाढली आहे. मास्क दुप्पट- तिप्पट किमतीत मिळत असल्याचे मेडिकल चालकांनी सांगितले. या काळ्या बाजारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मास्क मिळणे मुश्कील झाले आहे.

मास्कच्या किमती वाढल्या

हेही वाचा - भाजपचं ऑपरेशन लोटस फसलं? चार आमदार विशेष विमानानं भोपाळमध्ये दाखल

दिडशे रुपयांना मिळणाऱ्या मास्कची किंमत आता ४०० रुपये असल्याचे दुकानदारांनी सांगितले. सरकार कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. मात्र, सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणाऱ्या मास्कमध्ये काळाबाजार होत असेल तर आम्ही आमचे रक्षण कसे करायचे? असा प्रश्न नागिकांमधून विचारला जात आहे.

हेही वाचा - भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28, केंद्रीय आरोग्य मंत्र्याची माहिती

कोरोना विषाणूची दहशत भारतामध्येही पसरली आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषद घेतली असून देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 28 वर पोहचल्याची माहिती दिली. कोरोनाची लागण रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोरोना रुग्णासाठी स्वतंत्र वार्ड करण्याचे आदेश रुग्णालयाला दिले आहे. भारतात आलेल्या पर्यटकांची तपासणी सुरू आहे. संशयित लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे.

Last Updated : Mar 4, 2020, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.