नवी दिल्ली - आयएनएक्स माध्यम व्यवहारप्रकरणी आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सक्तवसुली संचलनालयातर्फे (ईडी) दाखल करण्यात आलेल्या खटल्यात पी. चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. या खटल्यात न्यायालयाने त्यांना 26 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. मात्र, सीबीआयच्या खटल्यावर निर्णय दिला नाही, त्यामुळे चिदंबरम सीबीआयच्या ताब्यात राहणार असून आता २६ तारखेला याप्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे.
-
Supreme Court grants interim protection from arrest to former Union Minister P Chidambaram, till August 26 in connection with INX media case probed by Enforcement Directorate pic.twitter.com/x2kxNYLl9O
— ANI (@ANI) August 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Supreme Court grants interim protection from arrest to former Union Minister P Chidambaram, till August 26 in connection with INX media case probed by Enforcement Directorate pic.twitter.com/x2kxNYLl9O
— ANI (@ANI) August 23, 2019Supreme Court grants interim protection from arrest to former Union Minister P Chidambaram, till August 26 in connection with INX media case probed by Enforcement Directorate pic.twitter.com/x2kxNYLl9O
— ANI (@ANI) August 23, 2019
ईडीने चिंदबरम यांच्या विरोधात मनी लाँड्रीग संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता २६ ऑगस्टपर्यंत इडीला चिदंबरम यांना ताब्यात घेता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. बानूमठी यांच्या अध्यक्षतेखालील या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
या सुनावणीच्या आधी चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी कोठडी गरजेची असल्याचे सीबीआयने विषेश न्यायालयात सांगितले होते. सर्व गोष्टींची शहानिशा केल्यानंतर न्यायालयाने चिदंबरम यांना कोठडी देण्याची मागणी मान्य केली होती. मात्र, वकिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दररोज ३० मिनिटे भेट घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली. तसेच दर ४८ तासाला त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.