नवी दिल्ली - गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून आज मंगळवारी बदली करण्यात आली आहे. मेघालयचे सध्याचे राज्यपाल तथागत रॉय यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती राष्ट्रपती भवनाने प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे.
या दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गोव्याच्या अतिरिक्त राज्यपाल पदाची जबाबदारीत घेण्यासाठी विचारणा करण्यात आल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मेघालयचे सद्याचे राज्यपाल तथागत रॉय यांनी आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. यातील तीन वर्षांचा कालावधी त्रिपुराचे राज्यपाल तर नंतरचे दोन वर्षे मेघालयात पूर्ण केला आहे.