ETV Bharat / bharat

शालेय अभ्यासक्रमात हिंदी किंवा संस्कृत सक्तीचे करा; झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांची मागणी - नीरा यादव

केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची विशेष बैठक शनिवारी दिल्लीमध्ये पार पडली. सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री या बैठकीला उपस्थित होते. यावेळी झारखंडच्या शिक्षण मंत्री नीरा यादव यांनी शाळांमध्ये हिंदी किंवा संस्कृत भाषा विषय सक्तीचा करावा असा प्रस्ताव मांडला.

नीरा यादव
author img

By

Published : Sep 22, 2019, 5:33 PM IST

Updated : Sep 22, 2019, 6:49 PM IST

नवी दिल्ली - दिल्लीतील विज्ञान भवन येथे शनिवारी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची विशेष बैठक पार पडली. केंद्रीय शिक्षण धोरणांसंदर्भात ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्यासह राज्यांचे शिक्षणमंत्री उपस्थित होते.

यावेळी झारखंडच्या शिक्षणमंत्री नीरा यादव यांनी शाळांमध्ये १२वी पर्यंत हिंदी किंवा संस्कृत भाषा विषय सक्तीचा करावा, अशी मागणी केली. यासोबतच, अंगणवाडी केंद्र आणि प्राथमिक शाळा या एकाच आवारात असाव्यात आणि शाळांमधील प्रयोगशाळा या अद्ययावत करण्यात याव्यात या मागण्यादेखील त्यांनी केल्या.

हेही वाचा : कोणी शाह, सुल्तान भारताची एकता तोडू शकत नाही - कमल हासन

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी कमी होत चालली आहे. त्यामुळे प्रयोगशाळा अद्ययावत झाल्यास विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये पुन्हा रस निर्माण होईल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यासोबतच नैतिक शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, जलसंधारण यादेखील विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे, आणि शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा केला पाहिजे, अशा मागण्या केल्याचेही यादव यांनी सांगितले.

हेही वाचा : हिंदीची सक्ती करावी असे म्हणलोच नव्हतो, अमित शाहांची कोलांटउडी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 'एक देश-एक भाषा' या घोषणेनंतर, बऱ्याच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि कलाकारांनी त्याला चांगलाच विरोध दर्शवला होता. त्यानंतर शाह यांनी नमते घेत, आपण हिंदीची सक्ती असावी असे म्हणलोच नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे, आता केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ यादव यांच्या प्रस्तावावर विचार करते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

शालेय अभ्यासक्रमात हिंदी किंवा संस्कृत सक्तीचे करावे, झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांची मागणी

केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची विशेष बैठक शनिवारी दिल्लीमध्ये पार पडली. सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री या बैठकीला उपस्थित होते. यावेळी झारखंडच्या शिक्षण मंत्री नीरा यादव यांनी शाळांमध्ये हिंदी किंवा संस्कृत भाषा विषय सक्तीचा करावा असा प्रस्ताव मांडला. 

नवी दिल्ली : दिल्लीतील विज्ञान भवन येथे शनिवारी केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाची विशेष बैठक पार पडली. केंद्रीय शिक्षण धोरणांसंदर्भात ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्यासह राज्यांचे शिक्षणमंत्री उपस्थित होते. 

यावेळी झारखंडच्या शिक्षणमंत्री नीरा यादव यांनी शाळांमध्ये १२वी पर्यंत हिंदी किंवा संस्कृत भाषा विषय सक्तीचा करावा अशी मागणी केली. यासोबतच, अंगणवाडी केंद्र आणि प्राथमिक शाळा या एकाच आवारात असाव्यात, आणि शाळांमधील प्रयोगशाळा या अद्ययावत करण्यात याव्यात या मागण्यादेखील त्यांनी केल्या.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी कमी होत चालली आहे. त्यामुळे प्रयोगशाळा अद्ययावत झाल्यास विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये पुन्हा रस निर्माण होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यासोबतच नैतिक शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, जलसंधारण यादेखील विषयांचा अभ्यासक्रमात समावेष केला पाहिजे, आणि शारीरिक शिक्षण हा विषय सक्तीचा केला पाहिजे अशी मागणीही केल्याचे यादव यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'एक देश-एक भाषा' या घोषणेनंतर, बऱ्याच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि कलाकारांनी त्याला चांगलाच विरोध दर्शवला होता. त्यानंतर शहा यांनी नमते घेत, आपण हिंदीची सक्ती असावी असे म्हणलोच नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे, आता केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ यादव यांच्या प्रस्तावावर विचार करते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 22, 2019, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.