ETV Bharat / bharat

'राहुल गांधींना दिलेली वागणूक म्हणजे लोकशाहीवरील गँगरेप' - राहुल गांधी धक्काबुक्की

राहुल गांधींसारख्या नेत्यांना जमिनीवर पाडत असाल तर, मी म्हणेन या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Oct 2, 2020, 11:50 AM IST

Updated : Oct 2, 2020, 4:54 PM IST

नवी दिल्ली - हाथरस बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्कीही झाली. या धक्काबुक्कीचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ज्या प्रकारे त्यांची कॉलर पकडली. याचे समर्थन देशातील कोणीही करू शकत नाही. गांधींसारख्या नेत्यांना जमिनीवर पाडत असाल तर, मी म्हणेन या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

  • #WATCH Shiv Sena leader Sanjay Raut says, "Rahul Gandhi is a national political leader. We may have differences with Congress but nobody can support Police's behaviour with him...His collar was caught & he was pushed to the ground, in a way it's gangrape of country's democracy." pic.twitter.com/qhcC8qLiqi

    — ANI (@ANI) October 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हाथरसमध्ये कलम 144 लागू असल्यामुळे त्यांना रोखण्याचं कारण, मी समजू शकतो. मात्र, राहुल गांधींसोबत जे वर्तन उत्तर प्रदेश पोलिसांनी केले आहे, त्याचे समर्थन या देशातील कोणतीच व्यक्ती करणार नाही. राहुल गांधी हे इंदिरा गांधी यांचे नातू आणि राजीव गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. हे आपण विसरायला नको, असे संजय राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींची कॉलर पकडली. त्यांना धक्काबुक्की करत जमिनीवर पाडले. तर, मी म्हणेन या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार आहे. या देशात कुणालाचा प्रश्न विचारण्याचा हक्क नाही का, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला.

Last Updated : Oct 2, 2020, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.