ETV Bharat / bharat

राजस्थानमध्ये काँग्रेसचा मोठा निर्णय... सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले - राजस्थान काँग्रेस बातमी

राजस्थानमध्ये बंडाची भूमिका घेऊन आपल्याच सरकारला आव्हान देणारे सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले आहे.

sachin-pilot-removed-as-deputy-chief-minister-in-rajasthan-dmp
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरुन हटवले...
author img

By

Published : Jul 14, 2020, 1:58 PM IST

Updated : Jul 14, 2020, 4:08 PM IST

जयपूर - राजस्थानमध्ये बंडाची भूमिका घेऊन आपल्याच सरकारला आव्हान देणारे सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने मोठी कारवाई केली आहे. काँग्रेसने सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले आहे. याबाबतची माहिती काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दिली आहे.

राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) पुन्हा काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सचिन पालट यांच्यावर मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना प्रदेशाध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री या दोन्ही पदांवरून हटविण्यात आले. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली.

सचिन पायलट यांच्यासह तीन मंत्र्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांनतर पायलट यांनी ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी लिहिले आहे की, 'सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं.'

sachin-pilot-removed-as-deputy-chief-minister-in-rajasthan-dmp
ट्विट

पायलट यांनी ट्विटवरून देखील उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख काढून टाकला आहे.

  • Sachin Pilot changes his bio on Twitter (pic 1) after being removed as Rajasthan Deputy Chief Minister and state Congress unit chief (Pic 2: earlier Twitter bio). pic.twitter.com/ro3UWqOdvN

    — ANI (@ANI) July 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर, या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचेही विधान समोर आले आहे. गहलोत यांनी थेट भाजपावर निशाणा साधला आहे. आपले काही सहकारी भाजपाच्या इशाऱ्यावर खेळ खेळत आहेत, मात्र, नाराजी होतीच तर, दोनदा विधिमंडळ पक्षाची बैठक झाली त्यात आपली नाराजी मांडायची होती, असे मत मुंख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

भाजपा घोडेबाजार करत असल्याची आम्हाला कल्पना होती. भाजपा देशभरात घोडेबाजार करत असून या सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सचिन पायलट देखील सहभागी आहेत, अशा प्रकाचा आरोप अशोक गेहलोत यांनी केला आहे. सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

  • There is nothing in Sachin Pilot's hands, it is the BJP which is running the show. BJP has arranged that resort and they are managing everything. The same team which worked in Madhya Pradesh is at work here: Rajasthan CM Ashok Gehlot pic.twitter.com/owKbOwxKjS

Last Updated : Jul 14, 2020, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.