तिरुवअनंतपुरम - केरळचे सहकार आणि पर्यटन मंत्री एन.सुंदरन यांनी शबरीमाला मंदिर भाविकांसाठी उघडणार नसल्याचे घोषित केले असून यंदा मंदिर समितीचा उत्सव देखील रद्द होणार असल्याचे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीने स्पष्ट केले. सद्यपरिस्थिती लक्षात घेता संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर मंत्रीमहोदयांनी सांगितले. तसेच याबाबत मंदिराच्या मुख्य पंडितांसोबत बैठक झाल्याचे ते म्हणाले.
त्रावणकोर देवस्थान बोर्ड आणि शबरीमाला मंदिर समिती यांनी एकत्र येऊन मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा आणि मासिक पुजेसह यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. शबरीमाला मंदिर मासिक पुजेसाठी १४ जूनला उघडते. यंदा महामारीच्या पार्श्वभूमीवर हे शक्य नाहीय. तसेच १९ जूनला होणाऱ्या पूर्वनियोजित यात्रेचा देखील पूनर्विचार करण्यात आला आहे. याबाबत मंदिरांच्या पंडितांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतरच मंदिर बंद ठेवण्याचा निर्यण घेतला आहे, असे सुंदरन यांनी सांगितले.
यंदाच्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १९ जूनला मंदिर उत्सव सुरू होणार होता. तसेच पुढील दिवशी पंपा नदीच्या किनारी आरत महोत्सवाची सांगता होते. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्यासह उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री सुंदरन यांनी दिली.