मॉस्को (रशिया)- आज नासा आणि रशियाच्या अंतराळविरांनी आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राकडे जाण्यासाठी यशस्वी झेप घेतली. कझाकस्तान येथील बाईकोनूर अंतराळ प्रक्षेपण स्थळावरून एका वेगवान अंतरिक्ष यानाच्या सहाय्याने या अंतराळविरांनी आपला प्रवास सुरू केला.
या अभियानात नासाच्या केट रुबिन्स आणि रशियन अंतराळ एजन्सी रोस्कोसमॉसचे सर्गे रायझीकोव व सर्गे कुड्सवेर्चकोव यांचा समावेश आहे. हे तिन्ही अंतराळवीर ६ महिन्याकरिता आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर कार्यरत असणार आहेत. यंदा अंतरिक्ष यान ३ तासात दोन कक्षा फिरून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर पोहोचणार आहे. या आधी अंतराळविरांना या पेक्षा दुप्पट वेळ लागला होता.
तिन्ही अंतराळवीर सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर कार्यरत असलेले नासाचे प्रमुख ख्रिस कॅसिडी, रोस्कोसमॉस कॉसमोनॉट्स अनाटोली इवानिशीन आणि इवान वागनर यांना सामील होती. सध्या कार्यरत असलेले तिन्ही अंतराळवीर हे एका आठवड्यानंतर पृथ्वीवर परत येणार आहे.
या अभियानासंबंधी काल बाईकोनूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात कोरोनापासून संरक्षणासाठी अंतराळविरांनी मॉस्कोतील स्टार सिटी प्रशिक्षण केंद्रात बरेच आठवडे घालवले. तसेच, प्रशिक्षणादरम्यान सर्व अंतराळविरांनी मास्क घातले होते. आम्ही दोन वेळा पीसीआर चाचणी केली आणि तीन वेळी अँटिजेन चाचणी देखील केल्याचे नासाच्या रुबिन्स यांनी सांगितले होते.
हेही वाचा- काश्मीरमध्ये धार्मिक शाळेतील 3 शिक्षकांवर पीएसएअंतर्गत कारवाई