तिरूवअनंतपूरम - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय असल्याचा पुरावा मागणारी याचिका केरळच्या थिस्सूर जिल्ह्यात दाखल करण्यात आली आहे. माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालाक्कुडी गावातील रहिवासी असलेल्या जोश कल्लूवेट्टील या व्यक्तीने ही माहिती मागवली आहे. १३ जानेवारीला त्याने याबाबत याचिका दाखल केली होती. यामध्ये त्याने नरेंद्र मोदी हे भारताचे नागरिक असल्याचा पुरावा असणारी कागदपत्रे दाखवण्यात यावीत अशी मागणी केली आहे.
भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायद्यामुळे देशभरात तणावाचे वातावरण आहे. या दोन्ही कायद्यांविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. आसाममध्ये एनआरसी लागू केल्यानंतर तब्बल १९ लाख लोकांना वगळण्यात आले होते. या यादीत नाव नसल्यामुळे बऱ्याच लोकांनी आत्महत्याही केल्याच्या घटना घडल्या होत्या. एनआरसी यादी ही आसाममधील लोकांच्या भारतीय असण्याचे परिमाण आहे.
केरळमध्येही सीएए आणि एनआरसीविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. केरळ सरकारने आपण राज्यात सीएए आणि एनआरसी लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही कायद्यांविरोधात केरळमध्ये सरकार आणि विरोधक असे दोन्ही पक्ष एकत्रितपणे आंदोलन करत आहेत.
हेही वाचा : BREAKING : निर्भया प्रकरण : आरोपींना एक फेब्रुवारीला होणार फाशी