ETV Bharat / bharat

कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना होतोय 'हा' त्रास...दिल्लीत स्वतंत्र वार्ड सुरू करण्याचा विचार

author img

By

Published : Sep 8, 2020, 7:00 PM IST

राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून मार्च १७ पासून सुमारे दीड हजार कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, त्यातील काही रुग्णांना विविध त्रास होत असल्याचे समोर आले आहे.

RGSSH
राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालय

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतरही काही व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि अंगदुखी यासारखी लक्षणे जाणवत असल्याचे राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने सांगितले आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर उपचार करण्यासाठी रुग्णालय स्वतंत्र वार्ड सुरू करण्याचा विचार करत आहे. कोरोना आजार बरा झाल्यानंतरही रुग्णांना त्रास का होत आहे? यावर डॉक्टरांकडून स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी रुग्णालय स्वतंत्र वार्ड सुरू करण्याचा विचार करत आहे.

राजीव गांधी रुग्णालयाने २० ऑगस्ट रोजी कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. कारण, अनेक कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींनी विविध लक्षणे दिसत असल्याची तक्रार केली होती, असे रुग्णालयातील कोविडसंबंधीचे नोडल अधिकारी डॉ. अजित जैन यांनी सांगितले. आता अशा रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

या रुग्णालयातून मार्च १७ पासून सुमारे दीड हजार कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली आहे. बरे झालेल्या रुग्णांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आम्ही व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप तयार केला आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता नियमितपणे फोन करत असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.

कोरोनातून बरे झालेल्या काही व्यक्तींना तणाव, श्वाच्छोश्वासास त्रास आणि झोपेसंबंधी तक्रारी येत असल्याचे आम्हाला अनेकांच्या प्रतिक्रियांतून कळाले, असेही त्यांनी सांगितले. यातून राजीव गांधी रुग्णालयाने पोस्ट कोविड क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. जर त्रास होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढतच राहिली तर कोरोना वार्ड सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. जैन म्हणाले. सध्या अशा व्यक्तींवर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.