नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त सध्या माध्यमात येत आहे. हे वृत्त चुकीचे व निराधार असल्याचे काँग्रेचे प्रवक्ते रणदिप सुरेजवाला यांनी सांगितले.
देशात काँग्रेसचा पराभव झाला याला जबाबदार कोण असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. हा मुद्दा मी आणि माझ्या पक्षा दरम्यानचा आहे. मी आणि काँग्रेसची कार्यकारणी यांच्यात या मुद्द्यावर चर्चा करणार असल्याचे गांधी म्हणाले होते.