हैदराबाद - अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आज (रविवारी) मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतने केलेल्या या आत्महत्येनंतर सर्वांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर फक्त सिनेजगतातच नव्हे तर राजकिय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्याला श्रद्धांजली वाहिली.
- सुशांत सिंह राजपूत... एक तेजस्वी अभिनेता खूप लवकर गेला. त्याने टीव्हीवर आणि चित्रपटांत उत्कृष्ट कामगिरी केली. मनोरंजन क्षेत्रात त्याच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली. त्याने अनेक संस्मरणीय कामगिरी मागे सोडली. त्याच्या निधनाने धक्का बसलाय. माझ्या संवेदना त्याचे कुटुंबीय आणि त्याच्या चाहत्यांसोबत आहे. ओम शांती. - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- सुशांत सिंह राजपूत यांच्या अकस्मात निधनाबद्दल ऐकून आश्चर्यचकित झालो. देव त्याचे कुटूंब, चाहते आणि प्रियजनांना सामर्थ्य देईल. - उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)
- प्रसिद्ध अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:खी झालो आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार, चाहत्यांसोबत माझ्या संवेदना. - देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र)
- पूछा न जिंदगी में किसी ने भी दिल का हाल.. अब शहर भर में जिक्र मेरी खुदखुशी का है ! - संजय राऊत, शिवसेना नेते
- हे खरं नाहीये... - अनुराग कश्यप (दिग्दर्शक)
- सुशांत सिंहच्या निधनाबद्दल ऐकून आश्चर्चचकित झालो. मी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करतो. - अभिनेते संजय दत्त
- या घटनेने मला धक्का बसलाय. मी निशब्द झालोय... प्रतिभावान अभिनेता... देव त्याच्या कुटुंबाला सामर्थ्य देईल. - अभिनेते अक्षय कुमार
- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने दु:खी झालो आहे. तो एक बहु प्रतिभावान तरूण अभिनेता होता. - पीयूष गोयल, रेल्वेमंत्री
- माझ्या प्रिय सुशांत .... पण का? ...का? - अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेते
- जीवन खूप नाजूक आहे आणि काय घडत आहे हे आम्हांला माहित नाही.. दया कर. - विरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू
- अशा तरूण कलावंतांनी अशी पाऊले उचलणे किती निराशाजनक... त्याच्या आत्म्यास शांती लाभो.... त्याच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना. - अशोक चव्हाण (सार्वजनिक बांधकामंत्री, महाराष्ट्र)
- शब्दांच्या पलीकडचा धक्का... मनापासून दु:खी. - रितेश देशमुख, अभिनेता
- तो मला खूप प्रेम करायचा. त्याची खूप आठवण येईल. त्याच्यातील ऊर्जा, उत्साह आणि त्याचे पूर्ण आनंदी स्मित. अल्लाह त्याच्या आत्म्यास शांती देवो. जवळच्या प्रियजनांसाठी संवेदना. खूप दु:खद आणि धक्कादायक. - अभिनेते शाहरूख खान.
- हे ह्रदय विदारक आहे. आमच्या दोघांच्या खूप आठवणी माझ्यासोबत आहेत. मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. जेव्हा हा धक्का कमी होईल. तेव्हा फक्त चांगल्या आठवणी राहतील. - दिग्दर्शक करण जोहर.
- सुशांतच्या निधनाची बातमी खूप वेदनादायी. त्याच्या परिवारासाठी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली. - अभिनेते अजय देवगण
- मी अजूनही विश्वास ठेवू शकत नाही. धक्कादायक. छान कलाकार आणि मित्र. निराशाजनक. मित्रा, भावपूर्ण श्रद्धांजली. परिवार आणि मित्रांसाठी संवेदना व्यक्त करतो. - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी
- जेम्स डीन आणि हेथ लेड्जर नंतर सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू अत्यंत धक्कादायक. - दिग्दर्शक राम गोपाल वर्मा