नवी दिल्ली - कोरोना विरोधातील लढाई एकजुटीने लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज( रविवारी) घरातील लाईटस् बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार टाटा समुहाचे चेअरमन रतन टाटा यांनी दिवा पेटवून एकतेचा संदेश दिला. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी टाटा समूह पुढे सरसावला असून तब्बल दीड हजार कोटींची मदत पंतप्रधान केअर फंडात जमा केली आहे.
आपण कोरोनासारख्या भयंकर संकटाचा सामना करत आहोत. सर्वांनी एकत्र येत आपण हा लढा दिला पाहिजे. एक दुसऱ्यांबद्दल सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवत आपण एकत्र यायला हवे. सर्वांनी एकत्र येत कोरोना विरोधातील लढाई जिंकू, असे ट्विट रतन टाटा यांनी एक तासापूर्वी केले आहे.
-
In the spirit of solidarity pic.twitter.com/1Svx5JZ0Vb
— Ratan N. Tata (@RNTata2000) April 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">In the spirit of solidarity pic.twitter.com/1Svx5JZ0Vb
— Ratan N. Tata (@RNTata2000) April 5, 2020In the spirit of solidarity pic.twitter.com/1Svx5JZ0Vb
— Ratan N. Tata (@RNTata2000) April 5, 2020
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या महामारीचा सामना करण्यासाठी टाटा ग्रुपने 500 कोटींची मदत दिली आहे. तर समुहातील टाटा सन्स या कंपनीने एक हजार कोटींची मदत दिली आहे. देशावर संकट आल्यावर टाटा समूह कायम मदतीला धावून येतो. मात्र, यावेळी सर्वात मोठे संकट भारतावर आल्याचे रतन टाटा मदत जाहीर करतेवेळी म्हणाले होते. याशिवाय टाटा समुहाने मुंबईतील ताज हॉटेल आरोग्य कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दिले आहे.