कोलकाता - पश्चिम बंगालधील ईस्ट बर्दवान जिल्ह्यात दुर्मिळ प्रजातीचे एक कासव आढळून आले. हे कासव पिवळ्या रंगाचे आहे. जिल्ह्यातील कालिग्राम-दिसपूर भागातून वन विभागाने कासवाला ताब्यात घेतले. सध्या हे कासव वन विभागाच्या ताब्यात आहे. वन विभागाचे अधिकारी देबाशिश शर्मा यांनी कासवाला वाचविल्याचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. हे पिवळ्या रंगाचे कासव खूप दुर्मिळ आहे.
पिवळ्या रंगामागील कारण
जनुकीय बदलांमुळे कासवाचा रंग पिवळा झाला असावा किंवा थायरोसिन हे रंगद्रव्य नसल्याने जन्मजात आजारामुळे त्यांचा रंग पिवळा झाला असावा, असे वन विभागाने म्हटले आहे. या वर्षात आत्तापर्यंत वनविभागाने दोन दुर्मिळ कासवांना वाचविले आहे.