ETV Bharat / bharat

भारतामध्ये मोदी-शाह यांच्या रुपात नाझी शासन, रणदीप सुरजेवाला यांची टीका - violence in JNU

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. काँग्रेस पक्षाकडून या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला आहे.

रणदीप सुरजेवाला
रणदीप सुरजेवाला
author img

By

Published : Jan 6, 2020, 1:01 PM IST

Updated : Jan 6, 2020, 3:03 PM IST

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. काँग्रेस पक्षाकडून या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला असून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 1933 नंतर आज भारतामध्ये हिटलरचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांवर हल्ले होत असून देशातील लोकशाही संपली आहे, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.

  • Randeep Surjewala, Congress: The entire country witnessed state sponsored goondism and terrorism yesterday in the campus of JNU. All this happened under the watch of JNU administration and also Delhi Police which is directly controlled by Home Minister Amit Shah. pic.twitter.com/3qvNaVjO0Z

    — ANI (@ANI) 6 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदी आणि अमित शाह यांच्या रुपामध्ये नाझी शासन आले आहे. जेएनयूमध्ये हल्ला केलेल्या गुंडाचा संबंध भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आहे. हे सर्व कुलगुरूच्या सहमतीने होत असून याला अमित शाह यांचे समर्थन आहे. विद्यार्थ्यांवरील हा हल्ला नियोजीत असून सरकार प्रायोजीत दहशतवाद आणि गुंडागीरीला अमित शाह जबाबदार आहेत, असे सुरजेवाला म्हणाले.

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मारहाण झाली. यावेळी पोलीस मुकदर्शक बनली होती. मोदी आणि अमित शाह यांची विद्यार्थ्यांसोबत कसले शत्रुत्व आहे. शुल्कामध्ये वाढ केल्याचा विरोध केल्यास विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. तर कधी संविधानावर झालेल्या हल्ल्याचा विरोध केल्यास विद्यार्थ्यांवर हल्ले केले जात आहे. सरकारी संरक्षणामध्ये जेएनयूत हिंसेचा नंगा नाच होत आहे, असे सुरजेवाला म्हणाले. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सुरजेवाला यांनी केली.

रविवारी चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशा घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) गुंडांनी आमच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे.

Intro:Body:

'भारतामध्ये मोदी-शाह यांच्या रुपात नाझी शासन' रणदीप सुरजेवाला यांची टीका

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर रविवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. काँग्रेस पक्षाकडून या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला असून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 1933 नंतर आज भारतामध्ये हिटलरचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांवर हल्ले होत असून देशातील लोकशाही संपली आहे, अशी टीका सुरजेवाला यांनी केली.

मोदी आणि अमित शाह यांच्या रुपामध्ये नाझी शासन आले आहे. जेएनयूमध्ये हल्ला केलेल्या गुंडाचा संबंध भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी आहे. हे सर्व कुलगुरूच्या सहमतीने होत असून याला अमित शाह यांचे समर्थन आहे. विद्यार्थ्यांवरील हा हल्ला नियोजीत असून सरकार प्रायोजीत दहशतवाद आणि गुंडागीरीला अमित शाह जबाबदार आहेत, असे सुरजेवाला म्हणाले.

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मारहाण झाली. यावेळी पोलीस मुकदर्शक बनली होती. मोदी आणि अमित शाह यांची विद्यार्थ्यांसोबत कसले शत्रुत्व आहे. शुल्कामध्ये वाढ केल्याचा विरोध केल्यास विद्यार्थांना मारहाण केली जाते. तर कधी संविधानावर झालेल्या हल्ल्याचा विरोध केल्यास विद्यार्थ्यांवर हल्ले केले जात आहे. सरकारी संरक्षणामध्ये जेएनयूत हिंसेचा नंगा नाच होत आहे, असे सुरजेवाला म्हणाले. तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सुरजेवाला यांनी केली.

रविवारी चेहरे झाकून गुंडांची फौज जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसली आणि शिक्षकांसह विद्यार्थ्यांना मारहाण केली. या हल्ल्यात विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) अध्यक्षा आयशा घोष गंभीर जखमी झाल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) गुंडांनी आमच्यावर हल्ला केला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे.

Conclusion:
Last Updated : Jan 6, 2020, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.