नवी दिल्ली - देशातील वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र जशी-जशी भाजपच्या खात्यातील रक्कम वाढत आहे. तस-तशी देशातील रोजगारात घट झाली आहे, असे रणदीप सुरजेवाला यांनी टि्वट करून म्हटले आहे.
काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांचे टि्वट दरवर्षी 2 कोटी रोजागार देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणजे 5 वर्षांत 10 कोटी रोजगार निर्माण व्हायला हवे होते. 5 वर्षांत देशातील 7 प्रमुख सेक्टरमध्ये तब्बल 3 कोटी 64 लाख बेरोजगार झाले आहेत. जशी-जशी भाजपच्या खात्यातील रक्कम वाढत आहे. तस-तशी देशातील रोजगारात घट झाली आहे. हेच मोदींचे चांगले दिवस होते का? असा सवाल सुरजेवाला यांनी टि्वटमध्ये केला आहे.आर्थिक संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या टोकावर पोहोचली आहे. त्यासोबत देशाचे राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर हा विक्रमी घसरला आहे. तर गेल्या पन्नास वर्षात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. देशाच्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने एक चिंतेची बातमी आहे.