हैदराबाद - रामोजी समूह तेलंगाणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तेलंगणामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. रामोजी ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा रामोजी राव यांनी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 5 कोटी रुपयांची देणगी तेलंगणा मुख्यमंत्री मदत निधीला जाहीर केली आहे.
गुरुवारी रामोजी समूहाच्या प्रतिनिधीने या रकमेचा धनादेश तेलंगणाच्या आयटी आणि नगरपालिका मंत्री के.टी. रामाराव यांच्याकडे सुपूर्द केला. हैदराबादमध्ये आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 कोटींचे नुकसान झाले आहे. यापूर्वीही रामोजी राव यांनी कोरोना विरोधात लढा देण्यासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांना प्रत्येकी 10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
ईनाडू-रामोजी समूहाने यापूर्वीही अनेकदा नैसर्गिक संकटावेळी मदत केली आहे. केरळला 2018 मध्ये 'न भूतो न भविष्यति' अशा पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. अनेक लोक बेघर झाली होती. पुराने हाहाकार माजवल्यानंतर विस्थापित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ईनाडू-रामोजी समुहाने हात पुढे केला. या मोहिमेअंतर्गत अलाप्पुझा येथील विस्थापितांना तब्बल 121 घरे बांधून दिली होती. त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले होते.