अहमदाबाद (गुजरात) - रिलायन्स समूहाचे संस्थापक दिवगंत धीरुभाई अंबानी यांचे मोठे भाऊ रमणिक भाई यांचे निधन झाले. वयाच्या 95 व्यावर्षी अहमदाबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रमणिक भाई यांचा जन्म 1924 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हिराचंद आणि जमुनाबेन अंबानी असे होते. ते तीन भाऊ होते. तिघांमध्ये रमणिकभाई सर्वात मोठे होते. धीरुभाई आणि नातूभाई अंबानी हे त्यांचे दोन भाऊ होते. तर त्रिलोचनाबेन आणइ जसूमतीबेन या दोन बहिणीही त्यांना होत्या. रिलायन्स इंडस्ट्रीजमधील सह-संस्थापक रमणिक भाई यांचा मुलगा विमल यांच्यानंतर धीरूभाई अंबानी यांनी विमलच्या कापड ब्रँडची सुरुवात केली. गुजरात सरकारमधील ऊर्जामंत्री सौरभ पटेल यांचा विवाह रमणिकभाई यांची मुलगी ईला हिच्यासोबत झाला आहे.