ETV Bharat / bharat

'काश्मीरमध्ये काँग्रेसने दहशतवादाची बीजे रोवले आणि पाकिस्तानने त्याचे पोषण केले' - हिंसाचार

काश्मीरमध्ये काँग्रेसची वर्षानुवर्षे सत्ता होती. काश्मीरमध्ये आज जी काही परिस्थिती आहे आणि जो काही गोंधळ चालू आहे त्याला पूर्णत: काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोप राम माधव यांनी केला आहे.

राम माधव
author img

By

Published : Jun 29, 2019, 3:39 PM IST

Updated : Jun 29, 2019, 3:44 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाची बीज रोवली आणि पाकिस्तानने या परिस्थितीचा भरपूर फायदा घेताना काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घातले, असा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी काँग्रेसवर केला आहे.

राम माधव म्हणाले, काश्मीरमध्ये १९८७ साली स्थानिक निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने गोंधळ घातला होता. यादरम्यान, काश्मीरमध्ये हिंसाचार आणि धार्मिक हिंसाचाराच्या घटना घडल्या. याचा फायदा घेताना पाकिस्तान आणि आयएसआयकडून काश्मीरमध्ये दहशतवाद आणि धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी मदत पुरवली जात आहे. यासोबतच पाकिस्तानने काश्मीरच्या घाटात दहशतवाद्यांना खतपाणी घातले आहे. हे सर्व काँग्रेसच्या चुकांमुळे झाले आहे.

काश्मीरमध्ये काँग्रेसची वर्षानुवर्षे सत्ता होती. काश्मीरमध्ये आज जी काही परिस्थिती आहे आणि जो काही गोंधळ चालू आहे त्याला पूर्णत: काँग्रेस जबाबदार आहे. अगदी नेहरुंपासून ते आतापर्यंत काश्मीरमध्ये जो काही वाद निर्माण झाला आहे, त्याचे कारण फक्त काँग्रेस आहे. काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या समस्यांपासून काँग्रेस पळ काढू शकत नाही, असेही राम माधव यांनी लोकसभेत काँग्रेसने काश्मीर मुद्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे.

Intro:Body:

2

Conclusion:
Last Updated : Jun 29, 2019, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.