नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत मांडण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० रद्द करून वचनपूर्ती केली, असे भाजप सरचिटणीस राम माधव यांनी टि्वट करत म्हटले आहे.
-
Promise fulfilled pic.twitter.com/iiHQtFxopd
— Ram Madhav (@rammadhavbjp) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Promise fulfilled pic.twitter.com/iiHQtFxopd
— Ram Madhav (@rammadhavbjp) August 5, 2019Promise fulfilled pic.twitter.com/iiHQtFxopd
— Ram Madhav (@rammadhavbjp) August 5, 2019
भाजप सरचिटणीस राम माधव यांनी नरेंद्र मोदींचे जुने छायाचित्र टि्वट केले आहे. हे छायाचित्र मोदी तरुण असतानाचे असल्याचं पाहायला मिळत आहे. '370 कलम रद्द करा आणि दहशतवाद संपवा', या प्रकारचे घोषवाक्य मोदी यांच्या छायाचित्रामागे असलेल्या पोस्टर्सवर आहे.
-
What a glorious day. Finally d martyrdom of thousands starting with Dr Shyam Prasad Mukharjee for compete integration of J&K into Indian Union is being honoured and d seven decade old demand of d entire nation being realised in front of our eyes; in our life time.Ever imagined?🙏
— Ram Madhav (@rammadhavbjp) August 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">What a glorious day. Finally d martyrdom of thousands starting with Dr Shyam Prasad Mukharjee for compete integration of J&K into Indian Union is being honoured and d seven decade old demand of d entire nation being realised in front of our eyes; in our life time.Ever imagined?🙏
— Ram Madhav (@rammadhavbjp) August 5, 2019What a glorious day. Finally d martyrdom of thousands starting with Dr Shyam Prasad Mukharjee for compete integration of J&K into Indian Union is being honoured and d seven decade old demand of d entire nation being realised in front of our eyes; in our life time.Ever imagined?🙏
— Ram Madhav (@rammadhavbjp) August 5, 2019
'आजचा दिवस किती गौरवशाली आहे. जम्मू काश्मीर भारतात विलीन व्हावं या डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांच्यासह हजारो हुतात्म्यांच्या इच्छेचा आज खऱ्या अर्थाने सन्मान झाला आहे. पूर्ण देशाची 7 दशके जुनी मागणी आज आपल्या डोळ्यासमोर पूर्ण झाली आहे. ही इच्छा पूर्ण होईल, असा कधी विचार केला होता का?, असे राम माधव यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
'३७०' या कलमामुळे जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा मिळतो, ते स्वायत्तता असलेले, भारतीय राज्य घटनेचा अगदीच नाममात्र अंमल असलेले जवळपास स्वतंत्र राष्ट्रच आहे. जम्मू काश्मीर जर भारताचा अविभाज्य भाग बनवायचा असेल तर हे कलम आणि ३५(अ) हेही कलम रद्द केले पाहिजे,' असे भाजपचे म्हणणे आहे.