ETV Bharat / bharat

राम जेठमलानी यांच्या जाण्याने निष्णात कायदेपंडित गमावला - पंतप्रधान मोदी

माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच, त्यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला आहे.

author img

By

Published : Sep 8, 2019, 12:42 PM IST

राम जेठमलानी

मुंबई/नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच, त्यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या निधनाने मला मोठे दुःख झाले आहे. ते आपल्या वाक्पटुतेच्या जोरावर सार्वजनिक मुद्द्यांवरील स्वतःचे विचार व्यक्त करत असत. राष्ट्राने एका प्रतिष्ठित न्यायविद्वान, विद्वान वकील आणि बुद्धिमान व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राम जेठमलानी यांच्या जाण्यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने विलक्षण विधिज्ञ आणि आदर्श व्यक्तीमत्त्व गमावले आहे. त्यांनी न्यायालय आणि संसद या दोन्ही ठिकाणी मोठे योगदान दिले. ते कोणत्याही ठिकाणी विनोदी, धाडसीपणे स्वतःला व्यक्त करत असत.

  • In the passing away of Shri Ram Jethmalani Ji, India has lost an exceptional lawyer and iconic public figure who made rich contributions both in the Court and Parliament. He was witty, courageous and never shied away from boldly expressing himself on any subject. pic.twitter.com/8fItp9RyTk

    — Narendra Modi (@narendramodi) September 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आणीबाणीच्या काळात त्यांनी अविचल राहून निर्भीडपणे लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. याची नेहमीच आठवण काढली जाईल. गरजवंतांना मदत करणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग होता.

जेठमलानी यांना भेटण्याची संधी मला अनेकदा मिळाली. मी त्यासाठी स्वतःला नशीबवान समजतो. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि इतर जवळच्या व्यक्तींच्या सोबत आहे. ते नसले तरी त्यांचे कार्य अबाधित राहील.

गृहमंत्री अमित शाह

भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ आण माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी यांच्या जाण्याने मोठे मला मोठे दुःख झाले. त्यांच्या जाण्याने केवळ एक विलक्षण वकीलच गमावलेला नाही तर, भरभरून जीवन जगणारा माणूसही गमावला आहे.

राम जेठमलानी यांच्या जाण्याने कायद्याच्या क्षेत्राशी संबंधित सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. कायद्याशी संबंधित विविध बाबींचे त्यांचे ज्ञान सखोल होते. यासाठी त्यांची नेहमीच आठवण काढली जाईल. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

जेठमलानी यांच्या जाण्याने मला खूप दुःख होत आहे. ते ज्ञानाचे भांडार होते. त्यांनी कायदे बनवण्यामध्ये मोठे योगदान दिले. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील एक निष्णात कायदेपंडित गमावला आहे.

'श्री जेठमलानी यांची विधी, समाजकारण आणि राजकारणातील कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण होती. फौजदारी कायद्यासोबतच दिवाणी कायद्यावरही त्यांचा अधिकार मोठा होता. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तबगारीने एक मानदंड निर्माण केला होता. त्यांनी लढवलेले काही प्रसिद्ध खटले मैलाचा दगड ठरले आहेत. बार असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचे त्यांनी नेतृत्व केले होते. अटलजींच्या मंत्रिमंडळात त्यांनी विधी व न्याय तसेच नगरविकास विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. विशेषत: आणीबाणीविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कायम स्मरणात राहील,' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या जाण्यामुळे मोठे दुःख होत आहे. ते स्वतः एक मोठी संस्था होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर येथील गुन्हेगारी कायद्याला योग्य आकार दिला. त्यांची कमतरता कशानेही भरून काढता येणार नाही. त्यांचे नाव देशाच्या कायद्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

Intro:Body:mh_mum_01_cmdf_jetmalani_demise_mumbai_7204684

निष्णात कायदेपंडित गमावला
मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई: माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील एक निष्णात कायदेपंडित गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. जेठमलानी यांची विधी, समाजकारण आणि राजकारणातील कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण होती. फौजदारी कायद्यासोबतच दिवाणी कायद्यावरही त्यांचा अधिकार मोठा होता. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तबगारीने एक मानदंड निर्माण केला होता. त्यांनी लढवलेले काही प्रसिद्ध खटले मैलाचा दगड ठरले आहेत. बार असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेचे त्यांनी नेतृत्व केले होते. अटलजींच्या मंत्रिमंडळात त्यांनी विधी व न्याय तसेच नगरविकास विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. विशेषत: आणीबाणीविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कायम स्मरणात राहील.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.