ETV Bharat / bharat

राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख ट्रस्टच्या बैठकीत होणार निश्चित ? - Ram mandir bhoomi pujan

राम मंदिराच्या बांधकामासाठी भूमीपूजनाची तारीख आज जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत ठरणार असल्याचे बोलले जात आहे. ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्यासह सदस्य बैठकीसाठी बुधवारी अयोध्येत आले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 18, 2020, 7:06 PM IST

अयोध्या - राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टची आज(शनिवार) अयोध्येत बैठक होणार आहे. या बैठकीत मंदिरच्या बांधकामासाठी भूमीपूजनाची तारीख ठरण्याची शक्यता आहे. संस्थानाचे अनेक सदस्य अयोध्येत पोहचले आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा बैठकीसाठी बुधवारी अयोध्येत आले आहेत. बैठकीची वेळ मात्र, समजू शकली नाही.

ट्रस्टचे इतर सदस्य गोविंद गिरी, कामेश्वर चौपाल आणि युगपुरुष स्वामी परमानंद आयोध्येत आले आहेत. इतर दोन सदस्य उत्तरप्रदेशचे अतिरिक्त आयुक्त अविनाश अवस्थी आणि अतिरिक्त गृह सचिव ग्यानेश कुमार अयोध्येत आले आहेत. जे सदस्य कोरोनामुळे येऊ शकत नाही, ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीशी जोडले जाणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव डॉ. कृष्ण गोपाल शुक्रवारी अयोध्येत आले आहेत. त्यांनी मंदीर बांधकामासंबंधी माहिती घेतली. गोपाल यांनी मंदिर संस्थानाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मंदीर बांधकामाचा निर्णय शनिवारच्या बैठकीत घेण्याचा मुद्दा त्यांनी चर्चेला घेतला होता.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत येऊन मंदिराच्या बांधकामाचा शिलान्यास करावा, असे राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत कमलनयन दास यांनी म्हटले. देशात कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर राम मंदिराचे भूमीपूजन पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, आता तारीख निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.