ETV Bharat / bharat

राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत दास यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Aug 13, 2020, 1:18 PM IST

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष म्हणत नृत्य गोपालदास यांना कोरोना झाला आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दास यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.

राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत दास यांना कोरोनाची लागण
राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत दास यांना कोरोनाची लागण

मथुरा - श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष म्हणत नृत्य गोपालदास यांना कोरोना झाला आहे. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दास यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची तब्येत बिघडली असल्याची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोनवरून त्यांची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नृत्य गोपालदास यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि डॉक्टरांशी संपर्क साधून दास यांच्या आरोग्यासंबंधी काळजी घेण्याच्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

मथुराचे जिल्हाधिकारी सर्वज्ञराम मिश्रा यांच्या माहितीनुसार महंत दास यांची कोरोना संदर्भातील अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये दास यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. मथुरेत आलेल्या नृत्य गोपालदास यांची तब्येत गुरुवारी अचानक बिघडली.

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा गोपालदास हे मथुरेतील सीताराम मंदिरात चार दिवसांसाठी ते वास्तव्यास होते. त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच डॉक्टरांचे एक पथक तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी त्यांच्यावर औषध उपचार सुरू केले. तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळावर दाखल आहेत. त्या ठिकाणी कोरोना संदर्भातील सर्व निर्देशांचे पालन केले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली. बुधवारी त्यांना थोडा ताप आला होता, त्यानंतर आज त्यांची तब्येत बिघडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.