ETV Bharat / bharat

राजनाथसिंह सिक्कीम आणि बंगालच्या दौऱ्यावर, लष्कराच्या 'फॉर्वर्ड पोस्ट'ला देणार भेटी - राजनाथ सिंह बंगाल दौरा

संरक्षण मंत्री पूर्व हिमालयातील सीमाभागात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांशी चर्चा करणार आहेत. सिक्कीममध्ये सीमेवर तैनात असलेल्या जवानांशी ते चर्चा करणार आहेत. आज दोन दिवसाच्या दौऱ्यासाठी ते निघाले आहेत.

Rajnath Singh
राजनाथ सिंह
author img

By

Published : Oct 24, 2020, 5:25 PM IST

नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज (शनिवार) दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीवरून ते पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगला आधी जाणार आहेत. या दौऱ्यात ते पूर्व हिमालयातील सीमाभागात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांशी चर्चा करणार आहेत. सिक्कीममध्ये सीमेवर तैनात असलेल्या जवानांशी ते चर्चा करणार आहेत.

पूर्व हिमालय भारतासाठी मोक्याचा

पूर्व हिमालयातही भारताची चीनबरोबर सीमा आहे. २०१७ साली चीनसोबत या भागात वाद झाला होता. सध्या लडाखमध्ये भारत-चीन सीमावाद सुरू असल्याने भारतीय लष्कराकडून संबंध सीमेवर लष्ककाराची तयारी सुरू आहे. संरक्षण मंत्री या भागातील सैन्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, तसेच जवानांचे मनोबल वाढविणार आहेत. ईशान्य भारत आणि पूर्व हिमालयावर चीनचा कायमच डोळा राहिला आहे. त्यामुळे भारताने या भागातही सज्जता वाढविली आहे. डोकलामवरून दोन्ही देशांमध्ये वाद झाला होता. तर संपूर्ण अरुणाचल प्रदेशवर चीनने दावा सांगितला आहे.

सिक्कीममध्ये सीमा भागातील रस्ते कामाचा शुभारंभ

भारताकडून सिक्कीमधील सीमा भागात रस्ते बांधणींचे काम सुरू आहे. डोंगराळ भागात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भारताने लक्ष दिले आहे. दसरा सण संपूर्ण भारतात साजरा केला जात असातानाच सिंह सिक्किमला भेट देत आहेत. त्यामुळे ते जवानांसोबत भारतीय संस्कृतीनुसार शस्त्रपूजा देखील करण्याची शक्यता आहे. फ्रान्सकडून राफेल विमानांचा ताबा घेतानाही राजनाथ सिंह यांनी विमानांची पूजा केली होती. आता चीनसोबत भारताचा सीमावाद चिघळला असताना संरक्षण मंत्री सीमाभागाचा दौरा करत आहेत.

जुलै महिन्यात केला लडाख दौरा

राजनाथ सिंह यांनी जुलै महिन्यात लष्कराचे मनोबल वाढविण्यासाठी लडाखचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी लुकुंग पोस्ट येथील जवानांशी संवाद साधला होता. लुकुंग हे ठिकाण पाँग्यांग त्सो तळ्याच्या पश्चिमेकडून असून दोन्ही सैन्यामध्ये धुमश्चक्री झाली, तेथून 40 किमीवर आहे. तर मोदींनी लडाखमधील निमू येथील लष्करी चौकीला 3 जुलैला भेट दिली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.