नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थ सचिव आणि निवृत्त आयएएस अधिकीरी राजीव कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काल (शुक्रवार) उशिरा कायदा आणि न्याय मंत्रालयाने त्यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केले. निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मंगळवारी राजीमाना दिल्यानंतर राजीव कुमार त्यांची जागा घेणार आहेत.
कुमार हे १९८४ च्या तुकडीचे झारखंड केडरमधील आयएएस अधिकारी आहेत. अशोक लवासा यांनी मंगळवारी राजीमाना दिल्यानंतर त्यांच्या जागी राजीव कुमार त्यांची नियुक्ती करण्यात आली. लवासा हे एशियन विकास बँकेचे उपाध्यक्षपदही भूषवत आहेत. ३१ ऑगस्ट रोजी म्हणजेच लवासा यांच्या कामाच्या शेवटच्या दिवशी राजीव कुमार पदभार स्वीकारणार आहेत.
-
Rajiv Kumar who has been appointed as the Election Commissioner will take charge of office on September 1. https://t.co/IbYOWuRBLe
— ANI (@ANI) August 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rajiv Kumar who has been appointed as the Election Commissioner will take charge of office on September 1. https://t.co/IbYOWuRBLe
— ANI (@ANI) August 21, 2020Rajiv Kumar who has been appointed as the Election Commissioner will take charge of office on September 1. https://t.co/IbYOWuRBLe
— ANI (@ANI) August 21, 2020
निवडणूक आयुक्त म्हणून लवासा यांचा सुमारे २ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक होता. येत्या काळात मुख्य निवडणूक आयुक्त म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली असती. मात्र, त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, पंजाब, मनिपूर, गोवा, आगामी काळात आहेत. मात्र, त्यांनी देशातील महत्त्वाच्या निवडणुकांआधीच पदाचा राजीमाना दिला. कार्यकाळ संपण्याआधीच राजीमाना देणारे ते आत्तापर्यंतचे दुसरे निवडणूक आयुक्त ठरले आहेत.
राजीव कुमार यावर्षी २९ एप्रिलला अर्थ खात्याच्या सचिव पदावरून निवृत्त झाले आहेत. ते आता आयुक्तपदाचा कारभार सांभाळणार आहेत. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळीही ते आयुक्तपदावर असतील.