ETV Bharat / bharat

शारदा चिटफंड घोटाळा : माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर

आज (शुक्रवार) सकाळी १० वाजून ३० मिनिटाच्या सुमारास सीजीओ कॉम्पेक्स येथील सीबीआयच्या कार्यालयात राजीव कुमार चौकशीसाठी हजर झाले.

राजीव कुमार
author img

By

Published : Jun 7, 2019, 4:29 PM IST

नवी दिल्ली - कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर झाले आहेत. याआधी राजीव कुमारांना समन्स बजावूनही ते चौकशीसाठी टाळाटाळ करत होते.

आज (शुक्रवार) सकाळी १० वाजून ३० मिनिटाच्या सुमारास सीजीओ कॉम्पेक्स येथील सीबीआयच्या कार्यालयात राजीव कुमार चौकशीसाठी हजर झाले. राजीव कुमार यांनी स्वत: शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी केली होती. चौकशी करताना पुरावे नष्ट केल्याचा आरोप त्यांच्यावर आहेत. यामुळे शारदा घोटाळ्याची चौकशी आता सीबीआयमार्फत चालू आहे.

राजीव कुमार हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जातात. ममतांनी त्यांच्यासाठी धरणे आंदोलन केले होते. राजीव कुमार यांच्यावर आरोप असतानाही ते सध्या बंगाल सीआयडीचे अतिरिक्त महानिर्देशक म्हणून काम पाहत आहेत.

Intro:Body:

sports desk2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.